कंधार न.पा.च्या दोन जागेसाठी लवकरच पोट निवडणुकिची शक्यता

हि फक्त झाकी, हुकमाचा एक्का बाकी...
काँग्रेसचा मुगैम्बो खुश हुआ....                                                  
कंधार (मयुर कांबळे) कंधार नगर पालीका निवडणुकीस एकदंरीत आठ महीन्याचा कालावधी झाला आहे.या आठ महिन्यात काय घडले हे सर्व जनतेनी पाहीले आहे.कोण खरं बोलतय व कोण खोट बोलतोय हे माञ आज पर्यंत जनतेला समजु शकले नाही. नगराध्यक्षा सौ.शोभाताई नळगे यांना नगराध्यक्ष पदावरुन हटवण्यासाठी शिवसेना शासनाकडे प्रर्यंत्न करत आहे. हे सर्व चालु आसतानाच  शिवसेनेच्या दोन नगरसेवकांनी सहा महिने होऊन गेले
असतानाही जात पडताळणी प्रमाणपञ दाखल केले नसल्याने नगरसेवक पद जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या दोन जागेसाठी पोट निवडणुका लागण्याची दाट शकेता वर्तवल्या जात आहे.सेनेच्या दोन नगरसेवकांचे पद जाणार असल्याने काँग्रेसचा मुगैम्बो माञ खुश झाले असून "हि फक्त झाकी आहे हुकमाचा एक्का अजून बाकी आहे".अशी गर्जना पुन्हा होताना दिसत आहे.                                             

कोणतीही निवडणुक आरक्षीत जागेवरुन लढवत असताना जात पडताळणी झालेल्या प्रमाणपञाची प्रत निवडणुक आयोगाला देणे बांधनकार आहे. ज्या उमेदवारांकडे जात पडताळणी झालेले प्रमाणपञ नसेल तर जात पडताळणी कार्यालयाकडे फाईल दाखल करुन त्याची पावती निवडणुकीत प्रस्ताव भरताना जोडुन निवडणुक लढवता येते. परंतु निवडुन आल्या नंतर सहा महीन्यात जात पडताळणी झाल्याचे प्रमाणपञ निवडणुक आयोगाला देण्याचा नियम आहे.जर का सहा महिन्याच्या कालावधीत जात पडताळणी प्रमाणपञ दाखल केले नाही तर त्या नगरसेवकाचे पद रद्द करण्याचा अधिकार आयोगाला आहे.कंधारमध्ये जात पडताळणी झाले नसलेले दोन नगरसेवक आहेत. प्रभाग दोन  ओबिसी प्रवर्गातून निवडुन आलेल्या पारुबाई पवार व  प्रभाग चार ओबीसी प्रवर्गातून निवडुन आलेले जालीम जानी बेगम हाजीमियाँ हे दोन नगरसेवक आरक्षीत जागेतुन निवडुन आले आहेत. निवडणुकीच्या वेळेस जात पडताळणी दाखल केलेली पावती जोडुन निवडणुक लढवली आहे. सहा महीन्याचा कालावधी संपला असताना सुध्दा या दोन्ही नगरसेवकांनी जात वैधता झालेले प्रमाणपञ जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल केले नाही.विशेष बाब म्हणजे सहा माहीन्याचा कालावधी संपत आला असतानाही जिल्हाधिकारी यांनी कसल्याच प्रकारचा

आहवाल मुख्यधिकारी यांच्याकडे पाठवला नाही. या संदर्भात काँग्रेसच्या नेत्यांनी या नगरसेवकांचे पद रद्द करण्याची मागणी केल्याने येथील राजकारणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे. त्यामुळे कायद्याच्या चौकटीत राहुन जिल्हाधिकारी यांनी कारवाई करून दोन नगरसेवकांचे पद रद्द केल्यास पुन्हा दोन जागेसाठी पोट निवडाणुक घ्यावी लागणार आहे. पंरतु  यामध्ये अनेक पळवाटा असल्याने नेमके काय होणार हे सांगता येणार नाही. हाती आलेल्या बातमी नुसार या दोन नगरसेवकांनी जिल्हाधिकारी यांना पञ देवून जात पडताळणी कार्यालयाकडे सर्व कागदपञे दिले आहेत. वेळीवेळी पाठपुरावा करुन सुध्दा  विलंब लागत आहे. त्यात आमचा काहीच व्दोष नसून जात पडाताळणी समितीच्या लोकांच्या हलगर्जी पणामुळे जात वैधता प्रमाणपञ मिळत नाही. असे पञाव्दारे कळवले असून जिल्हाधिकारी यांनी या दोन नगरसेवकांना दहा दिवसाची मुदत दिली असल्याचे समोर येत आहे.या अगोदर ही कंधार नगर पालीकेत अशाच प्रकार घडाला होता. हम्मीद सुलेमान यांच्या विरोधात एक नगरसेवक निवडुन आला होता. परंतु जात वैधता प्रमाणपञ दाखल केले नसल्यामुळे जिल्हाधिकारी यांनी नगरसेवकांचे पद रद्द करुन दोन नंबरवर आसलेले हम्मीद सुलेमान यांना नगरसेवक  म्हणून घोषीत केले होते. नविन नियमानुसार जात वैधता प्रमाणपञ नसेल तर तिन महीन्या नंतर निवडुन आलेल्या उमेदवारांच्या विरोधात न्यायलयात याचीका दाखल करण्याचा नियम आहे परंतु कोणीच तक्रार केली नाही.परंतु आता माञ हे दोन्ही नगरसेवक अडचणीत सापडले असून यावर नळगे यांना आयतेच कोलीत सापडले आहे. "हुकमाचा एक्का माझ्याकडे आहे त्यामुळे  पाच वर्ष नगराध्यक्ष काँग्रेसचाच राहील" अशी गर्जना काही दिवसापुर्वी अरविंद नळगे यांनी केली होती.त्यामुळे नेमका हुकमाचा एक्का कोणता असेल यावर तर्क विर्तर्क लढवल्या जात होते. या दोन नगरसेवकाचे पद जाणार आसल्याने काँग्रेसच्या गोटात आंनदाचे वातावरण पसरले आहे.त्यामुळे या दोन नगरसेवकांचे पद राहते की जाते या कडे सर्वाचे लक्ष लागले आहे. सध्या शिवसेनेकडे दहा नगरसेवक असल्याने त्यांच्याकडे बहुमत आहे. नगराध्यक्ष  हा काँग्रेसचा असल्याने विकासकामाला विरोध होत आहे. हे दोन नगरसेवकांचे पद रद्द झाल्यास शिवसेनेच्या दहा नगरसेवकावरुन आठ नगरसेवकावर आकडा येणार आहे. त्यामुळे सेनेच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कंधार न.पा.च्या दोन जागेसाठी पोटनिवडणुक लागते की काय अशी एकच चर्चा सध्या चालु आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी