विभागीय आयुक्त डॉ. भापकर यांच्या अध्यक्षतेखाली आज व्यापक आढावा बैठक

नांदेडप्रतिनिधी मराठवाडा विकासात्मक विविध कार्यक्रम विशेष मोहिम स्वरुपात राबविण्यासाठी  विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील विविध यंत्रणांकडून नियोजन तसेच आढावा घेण्यासाठी व्यापक दौरा सुरु केला आहे. त्याअंतर्गत डॉ. भापकर यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी 3 मे 2017 रोजी नांदेड जिल्ह्याची बैठक होणार आहे. बैठक सकाळी 10 वा. ए. के. संभाजी मंगल कार्यालय पावडेवाडी नाका येथे होणार आहे.
बैठकीत मागेल त्याला शेततळे, जलयुक्त शिवार अभियान, मनरेगा, वृक्षारोपण, स्वच्छ भारत मिशन, घरकुल योजना, राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान, सात / बारा संगणकीकरण, ईपॉज मशीन व ईपीडीएमएस या विषयांच्या अनुषंगाने नियोजन व अंमलबजावणीचा आढावा घेण्यात येणार आहे. बैठकीत जिल्हा स्तरावरील विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी तसेच सर्व उपविभागीय अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, सर्व विस्तार अधिकारी, कृषि पर्यवेक्षक, कृषि सहाय्यक, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, तसेच सर्व नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांच्याकडून विविध उपक्रम, योजनांच्या कामांबाबत आढावा घेण्यात येणार आहे. संबंधितांना वेळेत उपस्थित रहावे, असे निर्देशही जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आले आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी