केंद्रिय अनुदानित कँटीन मधून पोलिसांना मिळणार स्वस्त दारात साहित्य

नांदेड, रामप्रसाद खंडेलवाल केंद्रीय गृहमंत्रालयाच्या मध्यवर्ती कॅटींनच्या निर्देशानुसार अनुदानित कॅटींनच्या सुविधा आतापर्यंत केंद्रीय गृहमंत्रालयामध्ये कार्यरत, सेवानिवृत्त, पात्रताधारक अधिकारी व कर्मचारी तसेच केंद्रीय शस्त्र पोलीस बलाचे आणि केंद्रीय पोलीस संघटनांचे कार्यरत आणि सेवानिवृत्त कर्मचारी आणि अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांना या अनुदान तत्वावरील कॅटींनमधून जिवनावश्यक साहित्य मिळत होते. 

आता असा निर्णय झाला आहे की, महाराष्ट्र राज्य पोलीस विभागातील सर्व कार्यालये, त्यांच्या घटक कार्यालयातील पोलीस, मंत्रालयीन अधिकारी आणि कर्मचारी तसेच पोलीस विभागातून सेवानिवृत्त झालेले सर्व पोलीस, मंत्रालयीन अधिकारी व कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना राज्यातील कोणत्याही घटकातील अनुदानित कॅटींनमधून आपले अधिकृत ओळखपत्र दाखवून साहित्य खरेदी करता येईल. त्यामुळे अत्यंत कमी दरात मिळणाऱ्या वस्तू ज्या आजपर्यंत फक्त सेनेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना मिळत होत्या ते आता पोलीस दलातील सर्व अधिकारी, कर्मचारी व मंत्रालयीन स्टॉफ यांना पण मिळणार आहेत. या परिपत्रकात नमुद करण्यात आले आहे की, अनुदानित कॅटींनमधून खरेदी केलेल्या वस्तूंची व साहित्याची स्थानिक जनतेला कोणी पोलीस अधिकारी, कर्मचारी विक्री करेल, त्याचा व्यवसाय करील किंवा इतर कोणतेही गैरप्रकार करील तर त्याविरुध्द कायदेशीर कार्यवाही सुध्दा होणार आहे. राज्यातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना आपले अधिकृत ओळखपत्र साहित्य खरेदी करताना दाखविणे बंधनकारक आहे.

शहरातील महामार्ग महापालिकेच्या ताब्यात आले; दारू दुकाने सुरु होणार 

शहरातून जाणारे तीन राज्य महामार्ग महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात यावे असा प्रस्ताव महानगरपालिकेने सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग औरंगाबाद यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावानुसार दि. 2 मे रोजी शहरातील तीन मुख्य रस्ते महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आले असून यामुळे आता या रस्त्यावरील दारू व्यावसायिकांना मोठा दिलासा भेटला असून बंद झालेली दुकाने पुन्हा आता जोमाने सुरू होणार.

शहरातील 22.650 कि.मी. एवढी रस्ते महामार्गाने व्यापून गेले होते. दिवसेंदिवस वाढत जाणारा शहराची हद्द पाहता आजूबाजूच्या राज्य महामार्गही शहरात समाविष्ठ झाले होते. नुकतेच न्यायालयाने राज्य मार्ग आणि महामार्ग यालगत असणाऱ्या देशी दारू, वाईन शॉप, बिअर शॉप आणि बिअर बार यांच्यावर बंदी घातली होती. या नियमाच्या आधिन राहून शहरातील जवळपास 60 टक्क्यांच्यावर दारू विक्रीचे व्यवसाय बंद झाले आणि यापासून मिळणारा महसूल कमी झाला. विशेषत: महसूल कमी होण्यापेक्षा म्हणजे राजकीय नेते मंडळींच्या व्यवसाय बंद पडल्याने अनेकांना अडचणीचे झाले होते. यासाठी कायद्याची पळवाट काढण्यासाठी राजकीय मंडळींनी शहरातील सर्व राज्य मार्ग आणि महामार्ग महापालिकेच्या आधिन करण्यात यावे असा निर्णय घेतला आणि महापालिकेना तसा रितसर प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभाग औरंगाबादकडे पाठविला. यावर चर्चा करून बांधकाम विभागाने 19 एप्रिल 2017 रोजी हे रस्ते महापालिकेकडे हस्तांतरित केल्याचे पत्र पाठविले. यात शहरातून जाणाऱ्या राज्य महामार्ग क्र. 61 यामध्ये तिसगाव-अमरापूर-शेवगाव-पैठण-अंबड-धनसांगवी-कुंभारपिंपळ-आष्टी-पाथरी-पुर्णा-नांदेड या महामार्गावर जवळपास शहरातून 7 कि.मी.चा रस्ता जात होता. 

यामध्ये छत्रपती चौक-राज कॉर्नर-वर्कशॉप कॉर्नर-आनंदनगर चौक ते नागार्जुना हॉटेल तर महात्मा चौक ते वर्कशॉप कॉर्नर याचबरोबर महात्मा फुले चौक ते आण्णाभाऊ साठे चौक असा एकूण 7 कि.मी.चा रस्ता राज्य महामार्गानी व्यापला होता. तर वापी-नाशिक-निफाड-वैजापूर-औरंगाबाद-जालना-जिंतूर-औंढा-वसमत-अर्धापूर फाटा-नांदेड-धनेगाव हा राज्य महामार्गावर क्र. 2 यावर डॉ. शंकरराव चव्हाण चौक-माळटेकडी-नमस्कार चौक-महाराणा प्रताप चौक-बाफना-रेल्वे स्टेशन-देगलूर नाका-जुना गोदावरी पूल-वाजेगाव असा एकूण 12 कि.मी.चे अंतर तर कळमनुरी-साडेगाव-कुरूंदा-वसमत-आलेगाव-निळा-नांदेड-वाघाळा रस्ता या रस्त्यावर जुना मोंढा-गोदावरी पूल-आंबेडकर चौक असा एकूण 3.50 कि.मी. असा एकंदरीत 22.650 कि.मी. चा रस्ता महामार्गांनी व्यापला होता. या रस्त्यावरील न्यायालयाच्या आदेशानुसार अनेक दारूंच्या व्यावसायिकांना कुलूप लावण्यात आले होते. पुन्हा या रस्त्यावरील दारूचे दुकाने चालू व्हावेत अशा या उदांत हेतूने महापालिकेने बांधकाम विभागाने हे रस्ते आमच्याकडे देण्यात यावे, या रस्त्यांची देखभाल महापालिका करण्यासाठी सक्षम आहे असेही नमूद करण्यात आले. यामुळे एकंदरीत वरील सर्व रस्ते महापालिकेकडे हस्तांतरीत करण्यात आले असून या रस्त्यांची देखभाल आता बांधकाम विभाग न पाहता महापालिका पाहणार असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

राष्ट्रसंत अहमदपूरकर यांच्या उपस्थितीत कौठा येथे शिवकथेस प्रारंभ
राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत 1 ते 5 मे या कालावधीत कौठा परिसरातील यशोसाई हॉस्पीटलच्या शेजारी भव्य अशा शिवकथेचे आयोजन करण्यात आले असून या कथेला शहरासह जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थिती लावीत आहेत. हा कार्यक्रम 5 दिवस चालणार असून यात विविधि कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत. तरी या कार्यक्रमाचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन शिवकथा आयोजक विश्वकल्या ण प्रतिष्ठाण यांच्यावतीने करण्यात आले आहे.

शिवकथा ज्ञानयज्ञ व संस्कृती संवर्धन गौरव सोहळा आयोजन दि. 1 ते 6 मे या कालावधीत करण्यात आले आहे. या कार्यक्रमात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यात दैनंदिन कार्यक्रम सकाळी 5 ते 7 योगशिबिर, सकाळी 9 वाजता नाश्ता, सकाळी 9.30 ते 12 शिवकथा, दुपारी 12 वाजता भोजन, दुपारी 4 ते 6.30 संस्कृती संवर्धन गौरव सोहळा व सायंकाळी 6.30 वाजता सामुहिक शिवपाठ असा दैनंदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला शहरातील व जिल्ह्यातील विविध भागातून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत, तसेच या कार्यक्रमासाठी शिवकल्याण प्रतिष्ठाण नांदेडच्यावतीने भव्य अशा मंडपाची उभारणी कौठा परिसरातील यशोसाई हॉस्पीटलच्या शेजारी करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून महापौर सौ. शैलजा किशोर स्वामी ह्या आहेत. याच कार्यक्रमात राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांचा दि. 5 रोजी शत्तकोत्तर गौरव सोहळा व लक्षदीप उत्सव सोहळा केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, खा. अशोकराव चव्हाण व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा केला जाणार आहे. या शिवकथेचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन शिवकल्याण प्रतिष्ठाणच्यावतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी