खालसा हायस्कुलमध्ये विद्यार्थ्यांना गणवेश व शालेय साहित्यचे वितरण

नांदेड(प्रतिनिधी)गुरूद्वारा सचखंड बोर्ड द्वारा संचलीत खालसा हाईस्कुलच्या सभागृहात खालसा प्राथमिक पाठशाला हिदी, खालसा प्रायमरी स्कुल मराठी माध्यम, दशमेश बालक मंदीर हिंदी व मराठी माध्यम मध्ये शिकत असलेल्या जवळपास 850 विद्यार्थ्याना गणवेश, स्कुल बॅगचे वाटप करण्यात आले. तसेच मार्च 2016 एस.एस.सी परिक्षेतील गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला. प्रवेशासाठी विद्यार्थ्याचा वाढता कल पाहता दोन नविन दसमेश बालक मंदीर हिंदी व मराठी माध्यमच्या लहान व मोठा गट)उदघाटन करण्यात आला.

गणवेश गुरूद्वारा तखत सचखंड बोर्ड तर्फे आणि स्कुल बॅग संत बाबा बलविंदरसिंघ जी व संत बाबा नरीदंरसिंघ जी लंगर साहिब तर्फे देण्यात आले. काही दानशुर व प्रतिष्ठित व्यक्तीनी सुध्दा गणवेशा साठी आपले हातभार लावले. कार्यक्रम अति उत्सहात पार पाडला. कार्यक्रमाची प्रस्तावाना शाळेच्या मुख्याध्यापक स. चॉदसिंघ यानी केले. या प्रसंगी ऍड. अमरीकसिंघ जी वासरीकर सभापती, शिक्षण समिती गुरूद्वारा बोर्ड यांनी पदभार स्वीकारल्यापासुन आजतागायत शाळेची प्रगती बद्यल व समिती तर्फे करण्यात आलेल्या कामाच्या उल्लेख करून यापुढे शाळा पुन्हा मोठ नावलौकीक मिळवेल याबद्यल आशा व्यक्त केली. संत बाबा बलविंदरसिंघ जीनीं यापुढे ही शाळेसाठी कुठल्याही प्रकारची मदत लागल्यास देण्याची तयारी दर्शविली व विद्यार्थ्याना आर्शिवाद दिले.

गणवेश व स्कुल बॅग वाटपाचा कार्यक्रम संत बाबा बलविंदरसिंघ जी, ऍड. अमरीकसिंघ जी वासरीकर गुरूद्वारा बोर्ड सदस्य स. रणजीतसिंघ जी कामठेकर, स. भागीदंरसिंघ जी घडीसाज, स. दलजीतसिंघ जी हेैद्राबाद, शिक्षण समिती सदस्य स. जोगीदंरसिंघ रामगडीया, स. चंचलसिंघ जट, स. मनप्रितसिंघ कुंजीवाले, गुरूद्वारा बोर्ड चे ओ.एस.डी. स. डी.पी.सिंघ, कार्यकारी अधिक्षक स. ठानसिंघ बुंगई, सहा. अधिक्षक स. रणजीतसिंघ चिरागीया, स. नारायणसिंघ नंबरदार, आय.टी.आय. चे प्राचार्य स. गुरूबचनसिंघ यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. याप्रसंगी स. डी.पी.सिंघ जी यांचे समायोचित भाषण झाले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन स. सतपालसिंघ यांनी केले या प्रसंगी मोठया संख्येने पालक, विद्यार्थी संस्थेचे शिक्षक, कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी