भाजपचे करण्यासाठी कार्यकर्त्यांनी परिश्रम घ्यावे - वानखेडे

हिमायतनगर (अनिल मादसवार) हदगाव / हिमायतनगर विधानसभा मतदार संघात होऊ घातलेल्या  निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीचे कमळ फुलवन्यासाठी कार्यकर्त्यांनी ग्रामीण भागातील घराघरात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या योजनांची माहिती पोंचवावे असे आवाहन माजी खा.सुभाष वानखेडे यांनी केले. ते दि.26 ऑगस्ट रोजी दुपारी हिमायतनगर येथील महात्मा फुले सभागृहात झालेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत हदगाव भाजपचे अध्यक्ष तुकाराम चव्हाण, माजी पं. स. सभापती प्रमोद मामीडवार, बालाजी जाधव, गोविंदराव कदम आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.  

आगामी काळात होणाऱ्या हदगाव नगर परिषद निवडणूक व हदगाव - हिमायतनगर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या
निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपच्या शाखा उघडण्याचा झंझावात दौरा सुरु केला आहे. या माध्यमातून कार्यकर्त्यांची वज्रमूठ एका करून अप्रत्यक्षपणे शिवसेनेच्या चारी मुंड्या चित्त करण्याची जोरदार तयारी चालवली आहे. त्यानुसार शुक्रवारी हिमायतनगर येथे माजी खा.सुभाष वानखेडे यांनी कार्यकर्त्यांचि बैठक घेतली. यावेळी तालुका अध्यक्ष व कार्यकारिणी निवडण्यासाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. परंतु इकच्छुकांची संख्या जास्त दिसून आल्याने अध्यक्ष व कार्यकारिणी निवडीचा कार्यक्रम पुढील काळात होणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी बोलताना वानखेडे म्हणाले कि, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गोर - गरिबांसाठी विवविध योजना आखल्या आहेत. त्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोंचविणे, हदगाव नगरपालिका व जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये भाजपला भरघोस यश मिळवून देण्यासाठी परिश्रम करण्याचे आव्हान त्यांनी केले. यावेळी भाजपचे विद्यमान सरचिटणीस डॉ. प्रसाद डोंगरगावकर, कांतागुरु वाळके, नारायण करेवाड, विजय नरवाडे, यल्लपा गुंडेवार, सुधाकर पाटील, रामदास रामदिनवार, अनंता कदम, चांदराव वानखेडे, जांबुवंत मिराशे, नागेश कोथळकर, ज्ञानेश्वर पंदलवाड, शे.इस्माईल आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी काँग्रेस, मनसे, शिवसेना, समाजवादी आदी पक्षातील कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.

हि पद्धत योग्य नाही - गजानन तुप्तेवार 
आज हिमायतनगर येथे झालेल्या भाजपच्या बैठकीत भाजपचे विद्यमान तालुकाध्यक्ष गजानन तुप्तेवार अनुपस्थित होते. त्यांच्याशी बातचीत केली असता ते म्हणाले कि, निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता बैठकीचे आयोजन करण्यात आले. याचक माहिती आज मिळाल्याने मी उपस्थित राहू शकलो नाही. माजी खा.सुभाष वानखेडे याना तालुकाध्यक्ष व कार्यकारिणी निवडीचे कोणतेही अधिकार नाहीत, निवडीचे सर्व अधिकार भाजप जिल्हा कार्यकारिणीला आहेत. त्यांच्याकडून जे आदेश मिळतील त्याचे मी पालन करिन असे सांगून नव्याने भाजपात दाखल होणाऱ्यांचे आभार आणि स्वागत असल्याचे सांगितले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी