माता भागोंजी पुण्यस्मरण निमित्त भव्य लंगर-प्रसाद संपन्न


नांदेड(रवींद्र मोदी)शीख इतिहासात श्री गुरु गोबिंदसिंघ जी महाराज यांच्या सेनेतील वीर सेनापती म्हणून सुप्रसिध्द महिला माता भागों जी (भागकौर) यांच्या पुण्यस्मरण दिनांनिमित्त मंगळवार, ता. 09 ऑगस्ट रोजी गुरुद्वारा तख्त सचखंड परिसरातील बुंगा माईं भागों जी येथे धार्मिक कार्यक्रमश्रध्देच्या वातावरणात पार पडले. 

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गुरुद्वारा तख्त सचखंड हजूर साहिबचे मुख्य जत्थेदार संतबाबा कुलवंतसिंघ जी, मीत जत्थेदार संतबाबा ज्योतिंदरसिंघ जी, हेड़ ग्रंथी भाई कश्मीरसिंघ जी, मीत ग्रंथी भाई अवतारसिंघ जी शितल, धुपीया भाई रामसिंघ जी, भाई जगींदरसिंघ जी, गुरुद्वारा बोर्डाचे ओ.एस.डी. सरदार डी.पी.सिंघ चावला, गुरुद्वारा सदस्य भागींदरसिंखघ घडीसाज यांची उपस्थिती होती. यावेेळी मीत जत्थेदार संतबाबा ज्योतिंदरसिंघ जी यांनी पुण्यस्मरण कार्यक्रमाची अरदास (प्रार्थना) केली. या व्यतरिक्त श्री गुरु ग्रंथसाहेबाच्या पाठाचे समापन, श्री सुखमनी साहेब पाठांचे समापन, कीर्तन ही झाले. हजुरी रागी भाई गुरुप्रीतसिंघ जी, भाई किशोरसिंघ रागी यांनी कीर्तन केले. तसेच श्रीमती प्रकाशकौर खालसा यांच्या जत्थ्यातर्फे सुखमनी साहेबचे कीर्तन करण्यात आले. संतबाबा कुलवंतसिंघ जी आणि पंजप्यारे साहिबान यांना दस्तार व शाल सिरेपाव देऊन सत्कार करण्यात आले. माई भागोंजी बुंगा येथे सुमारे तीन शे वर्षार्ंपुर्वी माता भागोजी यांचे वास्तव्य होते. त्यांच्या निवासस्थान असलेल्या त्या जागेवर माताजींचे स्थान तयार करण्यात आलेले आहे. तसेच त्यांच्या ऐतहासिक शस्त्रांची ही सांभाळ या ठिकाणी करण्यात येते. वरील स्थानाची देखरेख व सेवा श्रीमती आसकौर बुंगाई, श्रीमती शांताकौर बुंगाई, सरदार मदनसिंघ बुंगाई, अजीतसिंघ बुंगाई, रणबीरसिंघ बुंगाई, सचिंदरसिंघ कोमलसिंघ बुंगाई आणि गुरुमीतसिंघ बुंगाई यांच्या तर्फे केली जाते. बुंगाई कुटुंबीयांतर्फे दरवर्षी भव्य प्रमाणात कार्यक्रम आयोजित केले जातात. मंगळवारी कार्यक्रमा दरम्यान भव्य लंगर प्रसाद कार्यक्रमाचे ही आयोजन करण्यात आले होते. हजारोंच्या संख्येत भाविकांनी लंगर प्रसाद ग्रहण केले. वरील कार्यक्रमात सरदार महिन्दरसिंघ दरोगा, स. केहरसिंघ, स. रामसिंघ चिरागीया यांच्या सह मोठया संख्येत सेवकांनी सेवा करुन कार्यक्रमाला यशस्वी केले. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी