जिल्हापरिषदेच्या लाचखोर कार्यकारी अभियंता अणि लेखा सहायक २ दिवस पोलिस कोठड़ी

नांदेड (खास प्रतिनिधी) जिल्हा परिषदेतील पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आणि लेखा विभागातील सहायक लेखाधिकारी यांनी काल पन्नास हजार लाच स्विकारल्या नंतर आज पहिले जिल्हा न्यायाधीश आनंद यावलकर यांनी या दोघांना १३ ऑगस्ट २०१६  पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
राजकुमार तानाजी श्रीरामवार हे जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागात कंत्राटदार म्हणून काम करतात. त्यांचे जवळपास साडेतीन लाख रुपयांचे वेगवेगळे बिल ज्यात प्रादेशिक नळ योजना, पंपींग मशिन दुरुस्ती आदींची थकीत बिले प्रलंबित होती. या बिलांचे पैसे मिळावेत म्हणून त्यानी पाठपुरावा केला होता.कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा गंगाधर परशुराम निवडंगे यांनी ती बिले मंजूर करुन श्रीरामवार यांचे साडेतीन लाख रुपये देण्यासाठी पन्नास हजाराची लाच मागितली. याबाबत श्रीरामवार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर काल बुधवारी दुपारी एक वाजता जिल्हा परिषद कार्यालयात लाचेची पन्नास हजार रुपये लेखा सहायक खाजा मोहियोद्दीन महंमद युसूफोद्दीन यांनी स्विकारले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्या दोघांना जेरबंद केले. त्यांच्याविरुध्द नांदेडच्या वजिराबाद पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७,१२,१३ (१) (ड) आणि १३ नुसार कारवाई झाली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक संजय कुलकर्णी यांनी या दोघांना आज गुरुवारी पहिले जिल्हा न्यायाधीश आनंद यावलकर यांच्यासमक्ष हजर केले. गुन्ह्याची संपूर्ण माहिती जमा करणे, श्रीरामवार यांची बिले आणि त्यांनी केलेली कामे तपासणे यासाठी या दोन्ही लाचखोरांची पोलीस कोठडी आवश्यक असल्याचा मुद्दा सहायक सरकारी वकील ऍड.डी.जी.शिंदे मांडला. न्यायाधीश आनंद यावलकर यांनी लाचखोरिचा आरोप असलेल्या  निवडंगे आणि शेख मोहिनोद्दीन यांना १३ ऑगस्ट २०१६ पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी