छंद म्हणुन फोटोग्राफि कला जोपासल्यास चांगलं जगण्याची संधी मिळते - बैजू पाटील

नांदेड(अनिल मादसवार)छायाचित्रण कलेच्या माध्यमातुन चमकदार कामगिरी करण्यासाठी वार्इल्ड लार्इफ फोटोग्राफी चांगला पर्याय आहे. निसर्गातील बदल जाणुन घ्यायचे तर जंगल टिपणारी नजर असायला हवी. छंद म्हणुन ही कला जोपासल्यास फोटोग्राफी तुम्हाला निश्चीत चांगलं जगण्याची संधी देते, असे प्रतिपादन जागतिक कीर्तीचे छायाचित्रकार बैजू पाटील (औरंगाबाद) यांनी केले.

नांदेड येथे स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत माध्यमशास्त्र संकुलामधे जागतिक छायाचित्र दिनाचे औचित्य साधुन 24 ऑगस्ट 2016 रोजी आयोजित कार्यक्रमात ‘‘फोटोग्राफी क्षेत्रातील करियरच्या संधी’’ या विायावर मार्गदर्शन बैजू पाटील बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर हे होते. या प्रसंगी माध्यमशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. दीपक शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. भारतातील बहुतंाश राटीय उद्याने, अभयारण्ये याना दिलेल्या भेटी, व्यावसार्इक फोटोग्राफर ते वार्इल्ड लार्इफ फोटोग्राफित मिळवलेले सर्वोच्च पुरस्कार, नविन क्षेत्रात काम करताना आलेल्या अडचणी व त्यावर केलेली मात आदी बाबीचा उहापोह करून बैजू पाटील यानी विद्यार्थ्यींशी मुक्त पणे संवाद साधला. मागिल 20 र्वाात आलेले अनुभव, फोटोग्राफितील बदललेले तंत्रज्ञान, प्रसार माध्यमातील संधी, बेसिक प्रिन्सीपल्स आदिंबाबत सविस्तर पणे त्यानी सांगितले.

पत्रकारितेत काम करताना फोटोग्राफर्सनी लेखन कौशल्य विकसित करायला हवे. विद्यार्थीनी छंद म्हणुन या क्षेत्राकडे वळायला हरकत नाही. फोटोग्राफि क्षेत्रात विविध प्रकार असुन क्रीयेटीव्ह कामालाच किमत मिळते. त्यासाठी काहीतरी वेगळे काम करून छाप उमटवावी लागेल. करियर म्हणुन नव्हे तर आपण केवळ छंद म्हणुन वार्इल्ड लार्इफ फोटोग्राफी कडे वळलो असल्याचे बैजू पाटील म्हणाले. उत्पन्नाचे दुसरे साधन असल्या शिवाय हा छंद परवडणारा नाही. त्यामुळे व्यावसार्इक स्टुडिओ उभारून पोर्ट फोलिओज, पोटे्रट, इंडस्ट्रियल फोटोग्राफि करित असल्याचे त्यांनी सांगितले. चित्रकलेचा फोटोग्राफित चांगला उपयोग होउ शकतो असे सांगुन स्लार्इड शोच्या माध्यमातुन त्यांनी आजवर काढलेली व जगात सर्वोत्कृट छायाचित्रे विद्यार्थ्यांना दाखविली. स्टुडिओ, मायक्रो, अंडरवॉटर फोटोग्राफि विायी त्यांनी सविस्तर पणे सांगितले. तसेच विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देउन शंका निरसन केले. विद्यार्थी दशेतच चांगली छायाचित्रे काढुन त्याचा व्यावसार्इक पध्दतीने भवियात कसा वापर करायचा? याच्या टिप्स ही त्यांनी दिल्या.

भारतातील जैविक विविधता कॅमे-याच्या माध्यमातुन टिपता येउ शकते. त्यासाठी कौशल्य विकसित करा, प्रामाणिक पणे काम करा, वेळ व शिस्त पाळा असा सल्ला ही बैजू पाटील यानी विद्यार्थ्यांना दिला. कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी आपल्या भााणातुन विद्यार्थ्यांना कलेचे महत्व सांगितले. ते म्हणाले, एखादयाची फोटोग्राफि पाहणे हा देखील एक अनुभव असतो. स्वानुभवातुन शिकलेल्या व्यक्तींचे ज्ञान म्हणजे नव निर्मितीच असते. मिडियात काम करणा-यानी छायाचित्रण कलेचा मुळातुन अभ्यास करायला हवा. विद्यार्थ्यांसाठी बैजू पाटील यांच्या सारखा अंतर राष्ट्रीय छायाचित्रकार प्रत्यक्ष भेटणे म्हणजे मोठी संधी आहे. असे ही कुलगुरू डॉ. विद्यासागर म्हणाले. माध्यमशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. दीपक शिंदे यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सांगितले की, मिडियात येउ इच्छिण-या विद्यार्थ्यांसाठी र्वाभर विविध कार्यक्रम व उपक्रम घेतले जात आहेत. चांगल्यातले चांगले ज्ञान देण्याचा प्रयत्न करण्याच्या सुचना कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यानी केल्या आहेत त्यानुसारच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. थेअरी व प्रात्याक्षिक ज्ञानातुन चांगले पत्रकार घडावेत, हा त्या मागचा उदेश आहे. मिडियातील अतिशय महत्वाचा घटक असलेल्या फोटोग्राफिचे तंत्रशुध्द मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. हा उपक्रम त्यासाठी निश्चित उपयोगी ठरेल, असा विश्वास डॉ. शिंदे यांनी व्यक्त केला.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी