भ्रष्टाचार करणाऱ्यांना सोडवण्यासाठी न्यायालयात जिल्हापरिषद अधिकारी-कर्मचारी यांनी दाखवली एकजूट

नांदेड(रामप्रसाद खंडेलवाल)५० हजार रुपयांची लाच स्विकारणाऱ्या कार्यकारी अभियंता व एका कर्मचाऱ्यांच्या बचावासाठी नांदेड जिल्हा परिषदेतील काहीअधिकारी-कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी आज न्यायालयात एकच गर्दी केली होती. याची चर्चा सबंध शहरात होत असून, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या भ्रष्टाचाराच्या पाठिशीही कर्मचारी मंडळी आहेत काय, अशी शंका आता येऊ लागली आहे.

काल जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता गंगाधर परशुराम निवडंगे आणि त्याचा सहायक खाजा मोहियोद्दीन महंमद युसूफोद्दीन यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ५० हजारांची लाच घेतल्यानंतर त्यांच्याच कार्यालयात जेरबंद केले. वजिराबाद पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आणि आज त्यांना न्यायालयात आणले जाणार हे निश्र्चित होते. त्यानुसार आज सकाळपासूनच न्यायालय परिसरात जवळपास दिडशे जण निवडंगे आणि खाजाला सोडविण्यासाठी, त्यांना मदत करण्यासाठी न्यायालय परिसरात ठाण मांडून होते. या लोकांच्या समूहात अनेक कंत्राटदार,संघटना पदाधिकारी मत गमत   न्यायालय परिसरात एकूण ६४  सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. त्यापैकी अर्ध्यापेक्षा जास्त कॅमेऱ्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या या भ्रष्टाचाराला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे चित्रीकरण झालेले आहे.

जिल्हा परिषदेमध्ये वेगवेगळ्या गावातून आपल्या कामांसाठी आलेल्या सर्वसामान्य लोकांची कामे बाजूला सारुन जिल्हा परिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी लाचखोरीचा आरोपी असणाऱ्या निवडंगे आणि खाजाला मदत करण्यासाठी न्यायालयात करत असलेली धडपड पाहून  भ्रष्टाचार करणे हा सर्वांचा अधिकारच आहे की काय, असे वाटत होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आपल्याच घरातील माणूस पोलिसांनी पकडला आहे असे भाव दिसत होते. जिल्हा परिषदेतील आपले कामकाज सोडून या जिल्हा परिषदेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी,जी प च्या शिक्षण विभागातील काही स्वयंघोषित स्वछ लोक आणि काही राजकीय मंडळी  न्यायालयात परिसरात का गेले होते याची चौकशी होण्याची गरज आहे. भ्रष्टाचाराला छुपी पाठीराखण करण्याची ही छुपी वृत्ती काहीअंशी थांबविता येईल. एकूणच भ्रष्टाचार हा सर्वसामान्यांच्या रक्तात रुजला आहे असेच आज न्यायालय परिसरात जाणवत होते. वर्ग १ चा अधिकारी कोमवाड हा सुध्दा सध्या पोलीस कोठडीत आहे. दुसरा वर्ग १ चा अणि वर्ग ३ चा अधिकारी काल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडला. या दोन्ही प्रकरणामुळे जिल्हा परिषदमध्ये त्यांच्या अधिकाऱ्यांची काय प्रतिष्ठा आहे हे सर्वसामान्य जनतेला दिसले.

या संदर्भाने जिल्हा परिषद अधीकारी-कर्मचारी यांनी न्यायालयात जाऊन लाचखोरीचा आरोप असणाऱ्या लोकांना सहकार्य करणे योग्य आहे काय असे पत्रकारांनी जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांच्या सोबत चर्चा केली असतांना अश्या प्रकारे भ्रष्टाचाराला पाठिंबा देण्यासाठी एकजूट दाखवणाऱ्या जिल्हा परिषदेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर योग्य कार्यवाही करणार असल्याचे सांगितले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी