जिवनोन्नती अभियानांतर्गत नांदेड तालुक्यातील बचतगटांना कर्ज मिळणार

नांदेड(प्रतिनिधी)केंद्र शासनाने सुरु केलेल्या राष्ट्रीय ग्रामीण जिवनोन्नती अभियानांतर्गत नांदेड तालुक्यातील दारिद्रय रेषेखालील बचतगटांना कर्ज मिळणार असून संबंधित बचतगटांनी पंचायत समिती कार्यालयात संपर्क करावा, असे आवाहन सभापती चंद्र भुक्तरे, गट विकास अधिकारी आर.सी.राऊत यांनी केले आहे.

केंद्र शासनाने सुरु केलेल्या राष्ट्रीय ग्रामीण जिवनोन्नती अभियानांतर्गत नांदेड तालुक्यातील दारिद्रय रेषेखालील 180 बचतगटांना 450 लक्ष रुपयांचे कर्ज उपलब्ध करुन देण्याचे उद्दिष्टये शासनाकडून प्राप्‍त झाले आहे. या अनुषंगाने नांदेड तालुक्यातील दारिद्रय रेषेखालील बचतगटांना हे कर्ज उपलब्ध करुन दिले जाणार आहे. कर्जासाठी आवश्यक असणारी दशसूत्री निकषाचे पालन करुन लाभार्थ्यांनी पंचायत समितीच्या एम.एस.आर.एल.एम.कक्षात विहित नमुन्यात अर्ज सादर करावेत असे सांगण्यात आले. नांदेड तालुक्यातील 12 बँकांना कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले असून नविन स्थापन झालेल्या दारिद्रय रेषेखालील गटांना जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत 15 हजार रुपयाचे खेळते भांडवल 75 गटांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासोबत पंडीत दिनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल योजने अंतर्गत संगणकीय कोर्ससाठी अठरा ते चाळीस वयोगटातील गरजू व्यक्तींना पंचायत समितीच्या एम.एस.आर.एल.एम. कक्षामार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जास्‍तीत जास्त गटांनी अर्ज सादर करावेत. यासाठी विस्‍तार अधिकारी धनंजय देशपांडे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सभापती चंद्र भुक्तरे, गट विकास अधिकारी आर.सी.राऊत यांनी केले आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी