पुणे येथील विवेक राष्ट्रीय लघुपट महोत्सवासाठी नांदेड येथील ‘जामुंडा’ लघुपट रवाना

नांदेड(प्रतिनिधी)महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समिती आणि आटपाट, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने नरेंद्र दाभोळकर यांच्या तृतिय स्मृति दिनानिमित्त विवेक राष्ट्रीय लघुपट महोत्सव दरवर्षी आयोजित केला जातो. या महोत्सवासाठी नांदेड येथील अक्षरोदय साहित्य मंडळ निर्मित ‘जामुंडा’ हा लघुपट पाठविण्यात आला आहे.
स्पर्धेचा विषय अंधश्रध्दा निर्मुलन असल्यामुळे लेखकाने त्याच विषयाला धरुन मांडणी केली आहे. लघुपटाची थोडक्यात कथा अशी आहे. ‘जामुंडा’ भोंदुबाबा लोकांना फसवुन त्यांना लुबाडत असतो. कोणाचे आजार बरे करतो, बायको नवर्‍याला नेहमी भांडते त्यातुन त्याची सुटका, पैशाची गरीबी तेथे पैशाचा पाऊस पाडतो, भुतबाधा झाली तर त्याच्या अंगातील भुतही काढतो, एवढेच नाही तर एखाद्या गर्भवती महिलेला मुलीचा गर्भ राहिला तर तो मुलामध्ये बदलवुन देतो. अशा करामती भोंदुबाबाचे भोंदुबाबाचे भांडवल तरी काय? तर फक्त लिंबु. त्या लिंबाच्या सहाय्याने लोकांच्या मनात भीती निर्माण करुन, अध्दश्रध्दा पसरवून त्यांना लुबाडतो. 

अशी ही पटकथा व संवाद विजय डोंगरे यांनी लिहिली आहे. निर्माता दिपक सपकाळे, तर दिग्दर्शन सदानंद सपकाळे यांचे आहे. लघुपटाचे चित्रीकरण प्रमोद ठाकूर यांनी केले आहे. लघुपटातील कलावंत मयुर दवणे, सुरेखा महादसवाड, अजित अटकोरे, प्रविण दवणे, विठ्ठलराव जोंधळे, उषा ठाकूर, ममता वाघमारे, सदानंद सपकाळे, नरेंद्र धोंगडे, वैष्णवी खानापुरकर आणि ‘जामुंडा’ च्या प्रमुख भुमिकेत नाट्यकलावंत विजय डोंगरे आहेत. सहभागी कलावंत सतीश वाघमारे, पांडूरंग कोकुलवार, अनुरत्न वाघमारे आदि कलावंतानी सहभाग नोंदवला आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी