स्मशानभूमी व पोलीस कॉलनीला लागूनच फेकला जातोय दुर्गंधीयुक्त कचरा

हिमायतनगर (प्रतिनिधी) गेल्या काही वर्षांपासून शहरातील नाले, रस्ते, यासह घराघरातील केर कचरा नगरपंचायतीच्या वाहनातून चक्क स्मशानभूमी व पोलीस कॉलनीला लागूनच असलेल्या व कोट्यवधी रुपये खर्चुन उभारण्यात आलेल्या बाजार ओट्या जवळ फेकला जात आहे. या दुर्गंधीने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तात्काळ घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी शहराबाहेर डम्पिंग ग्राउंड उभारून शहरचे विद्रुपीकरण थांबवावे अशी मागणी नागरीकातून केली जात आहे.
नव्याने अस्तित्वात आलेल्या नागरपंचातीमुळे शहरातील केर - कचरा व घाण नियमित उचलण्यात येत आहे. परंतु हि घाण वाहनातून संकलित केल्यानंतर याची विल्हेवाट लावण्यासाठी डम्पिंग ग्राउंड उपलब्ध नसल्याने हि घाण थेट बोरगडी रस्त्यावर असलेल्या पोलीस कॉलनी व स्मशानभूमी जवळ टाकली जात आहे. यामुळे येथे मोकाट जनावरांचा मुक्त वावर वाढला असून, हि घाण पसरून शहरातील आठवडी बाजारासाठी बांधण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयाच्या बाजार ओट्यावर जाऊन पडत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरु असताना संबंधितांनी याकडे अक्षम्य दुर्लक्ष करून बिनदिक्कतने आजही केर - कचरा याचा ठिकाणी टाकून परिसरातील आरोग्याला बाधा पोचविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप नागरीकातून केला जात आहे. दिवसेंदिवस शहरातील लोकसंख्या वाढत असून, त्यानुसार होणार कचरा एकत्रित करण्यासाठीची निविदा हदगाव येथील राजकीय वरद हस्त असलेल्या ठेकेदारास देण्यात आली आहे. सादर ठेकेदाराने कमिशन बेसवर घनकचरा उचलण्याचे काम हिमायतनगर शहरातील काही व्यक्तीकडे सोपविले आहे. यांच्याकडे असलेल्या 20 ते 25 मनुष्यबळाच्या साहाय्याने उचलून ट्रॅक्टर व घंटागाड्याच्या सहाय्याने स्मशानभूमीजवळ व शहरातील काही भागाच्या रस्त्याच्या कडेला टाकला जात आहे. कचरा उचलला जात असल्याने शहर स्वच्छ दिसत असले तरी शहरात प्रवेश करणारे रस्ते मात्र दुर्गंधीयुक्त कचऱ्याच्या ढिगार्याने विद्रुप होत असल्याने प्रशासनाच्या कार्याबाबत जनतेतून आश्चर्य व्यक्त होत आहे. एवढेच नव्हे तर ज्या स्मशानभूमीजवळ घाण कचरा टाकला जातो, तेथून हाकेच्या अंतरावर नगरपंचायतीचे कार्यालय आहे. घाणीची दुर्गंधी त्यांच्यापर्यंत पोचत असली तरी वातानुकूलित कक्षात बसलेल्याना याचा फारसा फरक पडत नसल्याचे दिसून येत आहे.

या ठिकाणी टाकल्या जाणाऱ्या घनकचऱ्यामुळे बांधण्यात आलेल्या बाजार ओट्याकडे दुकाने लावण्यास व्यापारी जायला तयार नसल्याने भविष्यात याचा वापर झाला नाही तर शासनाचे कोट्यवधी रुपयाचा निधी वाया जाण्याची शक्यता आहे. हि बाब व परिसरातील नागरिकांचे आरोग्य लक्षात घेता घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी शहराबाहेर डम्पिंग ग्राउंड तयार करून कचऱयाची विल्हेवाट लावावी. अन्यथा कचऱ्याचे उंच मनोरे तयार होऊन शहराचे विद्रूपीकरण झाल्याशिवाय राहणार नाही अश्या संतप्त प्रतिक्रिया शहरवासीय बोलून दाखवीत आहेत.  

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी