तामसा शहरात कुत्र्यांचा हौदोस चार चिमुकल्यांवर हल्ला

तामसा(विक्की मेहेत्रे)शहरात अचानक पाने कुत्र्यांच्या संख्येत लक्षणीय अशी वाढ झाली आहे त्याच बरोबर यातील बरेचसे कुत्रे हे पिसाळलेले असल्याने संपूर्ण तामसा शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

मंगळवार व बुधवार या दोन दिवसात तब्बल चार चिमुकल्यांवर या मोकाट कुत्र्यांनी हल्ला चढविला यात सार्थक वास्कर हा  8 वर्षीय शाळकरी मुलगा घरी जात असतांना येथील डॉ. भानेगावकर चौकात अचानक पणे सार्थक च्या हाताचा चावा घेतला तो जमिनीवर पडला असता आणखी तीन ते चार कुत्र्यांनी सार्थक कडे धाव घेत असतांनाच तेथे जवळ असलेले माजी भाजप शहर दीपक देशमुख यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ त्यांनी गाडी कुत्र्याच्या दिशेने घेतली देशमुख यांच्या मदतीला तेथील गोपाळ वास्कर हि आले व त्यांनी कुत्र्यांना पळवून लावल्याने पुढील अनर्थ टळला. हि घटना घडली न घडली त्याच्या काही वेळानेच साईनाथ खरात या बालकावरही कुत्र्यांनी हल्ला केला. 

ह्या दोन्ही घटना शहरात वाऱ्यासारख्या पसरल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असतांनाच बुधवारी ( दि. २4) रोजी सकाळी ११ च्या दरम्यान रुपाली महाजन या चार वर्षीय चिमुकलीवर कुत्र्याने हल्ला चढविला पण  वेळीच रुपालीच्या आज्जीने रुपालीला कुत्र्याच्या तावडीतून सुटका करू घेतली म्हणून पुढील अनर्थ टळला. यावर हि कुत्र्याने हल्ला चढविला उपचारासाठी पालकांनी सरकारी रुग्णालयात दाखल केले. परंतु त्यांना अ‍ॅन्टी रेबीज व्हॅक्सिन उपलब्ध नसल्यामुळे बाहेरून आणण्याचे सांगण्यात आले. कुत्रा चावल्यामुळे बरेचशे रुग्ण उपचारासाठी येतात. मात्र, अ‍ॅन्टी रेबीज व्हॅक्सिन उपलब्ध नसल्याने रुग्णांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. शहरातील विविध भागांमध्ये मोकाट कुत्र्यांची दहशत वाढत असताना त्याकडे प्रशासनाचे लक्ष नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे मोकाट कुत्र्यांचा हैदोस सुरूच आहे.

मोकाट कुत्र्यांची विल्हेवाट लावण्याची भाजपाची मागणी
-------------
शहरात वाढलेल्या मोकाट व पिसाळलेल्या कुत्रांची तात्काळ विल्हेवाट लावण्याची मागणी भाजपा च्या वतीने निवेदन देऊन करण्यात आली पण ग्राम पंचायत कार्यालयात ना ग्राम सेवक ना सरपंच नसल्याने निवेदन रिकाम्या खुर्चीला चिटकवून राग व्यक्त करण्यात आला. निवेदनावर भाजपा शहराध्यक्ष सचिन तांदळे, युवा शहराध्यक्ष राहुल शिंदे, विकेश मेहेत्रे, अर्जुन महाराज, दीपक देशमुख, जिनोद पठाण, संतोष सावंत, संभा जाधव, पंकज लाभसेठवार आदी जणांच्या स्वाक्षऱ्या होत्या                         

तामसा पोलीस ठाण्यात शांतात कमिटीची बैठक संपन्न 
तामसा(विक्की मेहेत्रे)पोलीस स्टेशन तामसा येथे मंगळवारी ( दि. 23) रोजी सायंकाळी 05:00 वा. स. पो. नि. महादेव गोमारे यांच्या मार्गदर्शनाखाली शांतता समिती बैठक व सन 2015 मध्ये उत्कृष्ठ कामगीरी केलेल्या गणेश मंडळाना बक्षिस वितरण आणि पंचाचे काम केलेल्याना गौरविण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. 

कार्यक्रमाची सुरुवात पत्रकार शशिकांत धानोरकर, संजय राहुलवार, जगदेराव पवार, राजूसिंग चौव्हान, आवेज पाशा यांच्या सत्काराने सुरु झाले तद्नंतर २०१५ मध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या गणेश मंडळाला प्रशस्ती पत्र देऊन गौरविण्यात आले. यात प्रथम स्थानी शिवशक्ती गणेश मंडळ, द्वितीय स्थानी राजहंस गणेश मंडळ, तर त्रितीय स्थानी सार्वजनिक गणेश मंडळ यांची निवड करण्यात आली. यावेळी गणेशोत्सव कायदायच्या कक्षेत बसवून शांतता पूर्वक तसेच पारंपरिक पद्धतीने साजरा व्हावा त्याचबरोबर गुलाल ऐवजी फुलांचा वापर व्हावा असे विविध मान्यवरांनी सुचविले. तर राजहंस गणेश मंडळाचे राहुल शिंदे यांनी आम्ही युवा वर्ग सांस्कृतिक सन एकदम पारंपरिक व मोठ्या उत्साहात व विविध अश्या लोकोपयोगी उपक्रम राबतो पण लोकप्रतिनिधी, ग्राम पंचायत व नागरिकांकडून म्हणावी तसे प्रोत्साहान मिळत नसल्याची खंतही बोलून दाखविली. कार्यक्रमाच्या अध्यक स्थानी डि. एस. वाळके ( एस डि पी ओ, भोकर)  तर प्रमुख पाहुणे म्हणून जि. परिषद सदस्य रमेश घंटलवार, दिलीप बास्टेवाड, व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष विजयकुमार लाभसेठवार, रावीकुमार बंडेवार, प्रभाकर महाजन, संतोष निल्लावार, भाजपा शहराध्यक्ष सचिन तांदळे, पत्रकार मंडळी , गणेश मंडळाचे पदाधिकारी तसेच गावकऱ्यांची उपस्थिती होती

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी