वसंत साखर कारखान्याच्या गैरकारभाराची साखर आयुक्ता कडून चौकशी सुरू

हदगाव(प्रतिनिधि)वसंत सहकारी साखर कारखान्यात मागील संचालक मंडळाच्या कार्यकाळात झालेल्या गैरकारभार व अनियमीयतेची चौकशी साखर आयुक्तांच्या आदेश्याने सुरू झाली असून, नकतेच यवतमाळ येथील जिल्हा विशेष लेखा परीक्षक श्रेणी-१ जी.पी. थोरात यांनी कारखाना स्थलावरील कार्यालयात दोन वेळा चौकशी केली.

वसंत सहकारी साखर कारखान्याचे सभासद विलास चव्हाण दुसरे सभासद तथा वसंतचे कर्मचारी रामराव कदम कोहलीकर व पंडितराव दादाराव देशमुख, गजानन सदाशिव लोखंडे यांनी वसंतचे माजी अध्यक्ष प्रकाश पाटील देवसरकर यांच्या कार्यकालात झालेल्या गैर कारभाराची व अनियमिततेची चौकशी करून दोषींवर कारवाही करण्याची व कारखान्याच्या झालेल्या नुकसानीची संबंधीतांकडून वसूली करण्याची मागणी अमरावतीच्या साखर आयुक्तांकडे केली होती. साखर आयुक्तांनी सदर प्रकरणी तक्रारदारांनी सादर केलेले सर्व दस्तऐवज तपासून सत्यता पटल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सर्व लेखे तपासून सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा विषेश लेखा परिक्षक जी. पी. थोरात यांना दिले असल्याने त्यांनी दि. १९ व २० अॉगष्ट रोजी वसंत कारखाना कार्यालयाला भेटी देवून दस्त ऐवजांचे परिक्षण केले. सदर प्रकरणी साखर आयुक्तांना अहवाल काय पाठवला किंवा पाठवला की नाही हे मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी