भोकरची समिती उस्मानाबाद जिल्ह्यात जाणार

महात्मा गांधी तंटामुक्त गावांच्या मुल्यमापनासाठी भोकरची समिती उस्मानाबाद जिल्ह्यात जाणार


भोकर (मनोजसींह चौव्हाण) महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिम अंर्तगत २० ते २३, आँगष्ठ दरम्यान भोकर येथील जिल्हा मुल्यमापन समिती उस्मानाबाद जिल्ह्यातील पाच गावांचे पुरस्कारासाठीे मुल्यमापन करण्यासाठी जाणार आहे.

नांदेड पोलिस अधिक्षकांनी भोकर येथील जिल्हा मुल्यमापन समितीचे अध्यक्ष म्हणुन तहसीलदार मारोतराव जगताप, सदस्य सचिव म्हणुन पो.नि.चंद्रशेखर चौधरी, सदस्य म्हणुन अँड. श्रीमती देवयानी सरदेशपांडे,पंचायत समिती सभापती, भोकर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोजसिंह चौव्हाण यांची निवड केली सदरील समिती उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील तुरोरी, तलमोड, महालिंगवाडी, तुळजापुर तालुक्यातील बोरगाव(तु),फुलवाडी या पाच गावाचे मुल्यमापन करणार आहे पाच गावचे मुल्यमापन करून समिती अहवाल उस्मानाबादचे पोलिस अधिक्षक यांच्याकडे देणार आहे. तसेच याच दरम्यान उस्मानाबाद जिल्ह्यातील  येडाशी, जहागीरवाडी, चिलवाडी, तेल आणि बामनवाडी या पाच गावांचे मुल्यमापन करण्यासाठी बिलोली येथील जिल्हा मुल्यमापन समिती जाणार आहे याबाबत पोलिस अधिक्षक कार्यालयाकडुन पत्र प्राप्त झाले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी