श्रीशैलम पातळगंगा ते मालेगाव कावड पदयात्रेचे नांदेड जिल्ह्यात आगमन

नांदेड(प्रतिनिधी)प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी मालेगाव जी.वाशीम येथील कावडधारी युवकांची श्रीशैलम  मल्लिकार्जुन पातळगंगा ते मालेगाव कावड पदयात्रा नांदेड जिल्ह्यात दाखल झाली असून, हर हर महादेव... जटाधारी सबसे भारीच्या जयघोषात पुढे मार्गस्त झाली आहे.

सह्याद्रीच्या पायथ्याशी उगम पावणाऱ्या पाताळगंगेच्या किनारी श्रीशैलम महादेवाचे जागृत व हेमाडपंथी मंदिर आहे. मंदिराची ख्याती दूर - दूरवर पसरली असून, आंध्रप्रदेश राज्यात असलेल्या जटाधारी महादेवाचे श्रावण मासात घेण्यासाठी भाविकांची तोबा गर्दी होते. गेल्या अनेक वर्षांपासून वाशीम जिल्ह्यातील मालेगाव येथील महादेवाचा अभिषेक करण्याची परंपरा योगेश्वर कावड मंडळाच्या युवकांच्या माध्यमातून जोपासली जाते. त्यासाठी पाताळगंगा श्रीशैलम मल्लिकार्जुन येथील महादेवाचे दर्शन घेऊन कावडीच्या माध्यमातून तेथील गंगेचे पाणी पदयात्रेद्वारे आणेल जाते. तीच परंपरा कायम ठेवत श्रावण मासाच्या पहिल्या दिवशीपासून निघालेली कावड पदयात्रा 15 ऑगस्ट म्हणजे दुसऱ्या श्रावण सोमवारी नांदेड जिल्ह्यात हर हर महादेव... जटाधारी सबसे भारीच्या जयघोषात दाखल झाली. यावेळी सादर कवाड यात्रेचे स्वागत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने करण्यात आले. तसेच पुढील यात्रेला जिल्हा उपाध्यक्ष अनिल मादसवार, भोरचे तालुकाध्यक्ष मनोजसिंह चौव्हाण, पांडुरंग गाडगे, कानबा पोपलवार, साईनाथ धोबे, दशरथ भदरगे, दिलीप शिंदे यांच्यासह अनेकांनी शुभेच्छा दिल्या. 

दि.01 रोजी वाशीम जिह्यातून वाहनाने श्रीशैलम मल्लिकार्जुन येथील महादेवाच्या दर्शनांसाठी गेलेले योगेश्वर मंडळाच्या युवकांनी दि.03 श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसापासून पदयात्रेला प्रारंभ केला. युवकांच्या सामानाच्या सोयीसाठी एका मोठे वाहन असून, भगव्या रंगाच्या योगेश्वर कावडीच्या चारचाकी गाड्यात महादेवाची पिंड आहे. यात सर कवडधाऱ्यानी आणलेले जलकुंभ असून, रस्त्यावर येणाऱ्या प्रत्येक गावचे नागरिक, महिला - पुरुष महादेवाचे दर्शन घेत आहते. मजल दरमजल करत हि कवाड यात्रा हैद्राबाद, निर्मल, भोकर, अर्धापूर मार्गे वाशीम जिल्ह्यातील मालेगाव येथे पोंचणार आहे. त्यानंतर शेवटच्या सोमवारी गावातून भव्य मिरवणूक काढून अभिषेक सोहळ्याने कावड यात्रेचा समारोप केला जातो. आमचा हा प्रवास 750 किलोमीटरचा आहे, आमच्या जिल्ह्यातून दरवर्षी जवळपास 5 ते 6 कावड धरी ग्रुप श्रीशैलम ते मालेगाव अशी पदयात्रा काढत असल्याचे कावड मंडळाचे प्रमुख विकास बाली यांनी सांगितले. सदर कावड यात्रेत शाम बाली, नागेश काटेकर, वैभव राऊत, युवराज ठाकूर, शुभम काटकर, शंकर बाली, गोकुळ बाली, उमेश राऊत, सचिन नाईकवाडे, गजानन बाली, किशोर दडगे, सोनू ठाकूर यांच्यासह अनेकांचा समावेश आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी