जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी माहूर तहसीलदारांना दिले निवेदन

नांदेड(प्रतिनिधी)राज्याच्या सर्व विरोधी राजकीय पक्षाच्या आमदारांनी स्वतःच्या पगारी आणि पेन्शनचा मुद्दा अत्यंत कमालीच्या एकजुटीने सोडविला तसेच राज्य अधिकारी-कर्मचारी यांच्या जुन्या पेन्शनचा मुद्दा त्वरित सोडवावा अश्या आशयाचे निवेदन महाराष्ट्र जुनी पेन्शन हक्क संघटनने माहूर तलसीलदारांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे. 
माहूरचे तहसीलदार बिरादार आणि माहूर तालुका सभापती चिंतामण राठोड यांना दिलेल्या निवेदनात महाराष्ट्र जुनी पेन्शन हक्क संघटना नमूद करते की, राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचारी आपल्या परीने खूप मेहनत घेऊन काम करतात पण त्यांना नवीन डीसीपीएस पेंशन योजना लागू करण्यात आली आहेत.तरी राज्य सरकारने नवीन डीसीपीएस योजना ऐवजी जुनी पेन्शन योजना लागू करावी जेणे करून सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांचे भविष्य नियमित राहील. आपले सर्व आयुष्य शासनाची सेवा करणाऱ्या सर्व विभागातील अधिकारी-कर्मचारी यांना जो पर्यंत जुनी पेन्शन योजना लागू होणार नाही तो पर्यंत हा लढा सुरु राहील असे निवेदनात नमूद आहे.हे निवेदन देतांना सचिन बटाले,शशीमोहन थुटे,शशिकांत जिचकर,गोरख जगताप,विशाल दोडके,रोहिदास जाधव,गंधे सर,हेमंत टेभरें,खांडेकर आदी उपस्थित होते. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी