लोह्याचे वाहतूक नियंत्रक राठोड व पत्रकार सचिन पवार यांची सतर्कता


अपहरकर्ता शाळकरी मुलगा आई-वडिलांकडे..!लोहा(हरिहर धुतमल)लातूर येथील शाळकरी मुलगा यशोदिप बाळासाहेब माने हा दुपारी शिकवणी वर्गाला जात असतांना अज्ञातांनी त्याला बेहोश करून अपहरण केले. त्यासलातूर हुन  नांदेड कडे एसटीने आणतांना लोह्यात त्याला होश आला. तो भेरदला होता,.. भीतीने थरथरत होता... बसस्थानकात पत्रकार सचिन पवार यांच्याकडे मोबाईलची मदत मागितली. त्याने वडील-आईंना सगळी हकीकत सांगितली. लोह्याचे वाहतूक नियंत्रक यु.बी. राठोड व सचिन पवार यांनी रात्री साडेअकरा वाजता नातेवाईकांच्या हवाली केले. ही घटना मंगळवारी सायंकाळी 6 च्या सुमारास घडली. राठोड व पवार यांच्या सतर्कतेमुळे अपहरण शाळकरी मुलाची आपल्या आईं वडिलांना मिळाला.
मंगळवारी सायंकाळी 6 वाजताची वेळ, नित्यनियमाप्रमाणे पत्रकार सचिन पवार हे पांडूरंग राहटकर यांच्या लोहा बसस्थानकातील न्युजपेपर बुक स्टॉलवर बसले होते. तेवढ्यात लातूरहून नांदेडकडे जाणार्‍या बसमधून पंधरा वर्षीय शाळकरी मुलगा भेदरलेल्या अवस्थेत बुक स्टॉलजवळ आला... तो रडत होता, भीतीने थरथरत होता. पत्रकार पवार यांनी त्याची विचारणा केली. सचिन कडे त्याने मोबाईलवरून फोन लावण्यासाठी मदत मागितली. सहकार्यवृत्ती असलेल्या सचिन पवार यांनी त्यास मोबाईल दिला. त्याचे कारण जाणून घेतले. तु भीऊ नको, असा धीर दिला असे सांगितले  व यशोदिपच्या  वडीलला सविस्तर बोलला त्यानंतर  नियंत्रक यु.बी. राठोड यांना सर्व माहिती दिली . विजय चन्नावार, राजू कळसकर, पांडूरंग राहटकर यासह बसस्थानकात काहीजण मदतीला धावले. नियंत्रक राठोड यांनी आई-वडील, नातेवाईकांना धीर दिला. व यशेदीपची लोहा पोलिसांत माहिती दिली. पोनि अशोक चाटे यांनी जमादार जायभाये यांना तात्काळ मदतीला दिले. पत्रकार सचिन पवार, राठोड यांनी त्यास दवाखान्यात नेले. त्याला जेवण करायला लावले.रात्रीची वेळ होती नातेवाईकांची वाट् पाहत ते मुलासह बसस्थानकात बसले.

रात्री 11.30 वाजता   व नातेवाईक आले त्यांनी यशोदीपला पाहताच हंबरडा फोडला. त्यांनी नियंत्रक राठोड, पत्रकार सचिन पवार व छावाचे बळी पवार पाटील यासह पोलिसांचे आभार मानले. मुलगा सापडला, देवरूपाने तुम्ही आलात म्हणून वडील पटपटा हात जोडत होते. राठोड व पवार यांच्या सतर्कतेमुळे शाळकरी मुलगा आपल्या आई-वडीलांना मिळाला. एसटी महामंडळ "बहूजन हिताय" असते हे राठोड यांच्या व सचिनच्या कार्याने सिद्ध झाले...घटने मागे काय प्रकार आहे हे समजू शकले नाहीआज बुधवारी मुलाच्या वडील बालासाब माने यानी फोनद्वारे कृतज्ञता व्यक्त केली

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी