1 कोटी 18 लाख 82 हजारांचा अपहार करणाऱ्या कोमवाडला जामीन अर्ज फेटाळला

नांदेड(रामप्रसाद खंडेलवाल)1 कोटी 18 लाख रुपये 82 हजार रुपये हा शासनाचा निधी आपल्या करोडोपती होण्यासाठी वापरणाऱ्या जिल्हा परिषदेचा उपमुख्य कार्यकारी अधिकारी उत्तम आनंदा कोमवाडने मागितलेली जामीन मुख्य न्यायदंडाधिकारी एस.एन.सचदेव यांनी फेटाळून लावली आहे.

दि.5 ऑगस्ट रोजी रात्री जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी उत्तम आनंदा कोमवाड यांनी 1 कोटी 18 लाख 82 हजार रुपयांची शासनाची रक्कम दिल्ली आणि फरीदाबाद येथील खासगी व्यक्तींच्या नावावर आरटीजीएस या बॅंक सिस्टीमच्या आधारे वर्ग केली होती. मुळात त्यांना 60 हजार रुपयापेक्षा जास्त रक्कम आपल्या हस्ताक्षराने, आपल्या अधिकारात देता येत नाही. तरी पण एवढा मोठा व्यवहार कोमवाड यांनी केला. जिल्हा परिषदेच्या सर्वसामान्य विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल काळभोर यांच्या तक्रारीवरुन पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी उत्तम आनंदा कोमवाड विरुध्द भादंविच्या कलम 406,409,420 आदीनुसार गुन्हा दाखल झाला.वजिराबाद पोलिसांनी उत्तम कोमवाडला  6 ऑगस्ट रोजी अटक केली. 7 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट, 10 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट आणि 13 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट अशी तीन टप्प्यामध्ये नऊ दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली. या दरम्यान पोलिसांनी त्यांनी ज्या बनावट प्रकारच्या कोणत्या तरी बिया मिळविण्यासाठी या शासकीय निधीचा उपयोग केला होता त्या बियांचे काही नमुने पोलिसांनी जप्त केले आणि ते न्यायवैद्यक प्रयोग शाळेकडे परिक्षणासाठी पाठविले आहेत. 

16 ऑगस्ट पोलीस कोठडी संपल्यानंतर सदरचा गुन्हा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कक्षेतील असल्याने उत्तम कोमवाड यांना जामीन मिळावा यासाठी त्यांच्या वतीने अर्ज दाखल करण्यात आला. या अर्जावर सरकारी वकील आणि पोलीस यांनी दिलेल्या उत्तरानंतर अंतिम सुनावणी झाली. अंतिम सुनावणीमध्ये सरकारी वकील ऍड.रमेश लोखंडे यांनी शासकीय पैसा जो सर्वसामान्य जनतेचा आहे आणि तो सर्वसामान्य जनतेच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी वापरायचा असताना कोमवाडने तो पैसा स्वतःच्या प्रगतीसाठी, करोडपती होण्यासाठी वापरला ही बाब अत्यंत निंदनीय असून, रक्कम सुध्दा एक कोटीपेक्षा जास्त असल्याने त्याला जामीन देण्यात येऊ नये, असे सांगितले. हा युक्तीवाद मान्य करुन मुख्य न्यायदंडाधिकारी एस.एन.सचदेव यांनी 1 कोटी 18 लाख 82 हजारांचा अपहार करणाऱ्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी उत्तम आनंदा कोमवाडचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी