धूळ पेरणीला सुरुवात

पावसाच्या प्रतीक्षेतील बळीराजाची हिमायतनगर तालुक्यात धूळ पेरणीला सुरुवात 

हिमायतनगर(प्रतिनिधी)मृग नक्षत्र अर्धे संपण्याच्या मार्गावर असताना पाउस झालेल्या भागातील बळीराजाने पेरणीला सुरुवात केली असून, उर्वरित भागात पाउस पडणार या अपेक्षेने शेतकर्यांनी धूळ पेरणीला सुरुवात केली आहे. 

रोहिणी नक्षत्राच्या उत्तरार्धात व मृग नक्षत्राच्या पूर्वार्धात पावसाने चुणूक दाखवून हलकीशी सुरुवात केल्याने बळीराजाचे चेहरे आनंदित झाले. तालुक्यातील काही भागात दमदार पाउस झाला तर काही भागात जेमतेम. परंतु बियाणे पेरणीसाठी मृग नक्ष्तर लाभदायी असल्याचा शेतकऱ्यांचा समाज असल्याने पेरणीला सुरुवात झाली आहे. तर काही भागात पाउस पडला नसल्याने कोरड्यावरच शेतकर्यांनी धूळ पेरणीला सुरुवात केलायचे चित्र दिसून आले आहे. तालुक्यातील मंगरूळ, खैरगाव, वडगाव ज. सिबदरा, धानोरा, वारंगटाकळी, सवना ज., रमनवाडी , महादापूर, एकघरी, वाशी, कार्ला पी, सिरंजणी, एक्म्बा  परिसरातील ५० टक्क्याच्या वर शेतकर्यांनी पेरण्या केल्या आहेत. तर टेंभी, हिमायतनगर, आंदेगाव, पवना, दरेसरसम, खडकी बा., पळसपूर, डोल्हारी, घारापुर येथील शेतकर्यांनी धूळ पेरणीला सुरुवात केली असून, त्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. 

गेल्या अनेक वर्षापासून तालुक्यातील शेतकरी नैसर्गिक आपत्ती, अल्प पावसामुळे आर्थिक अडचणीत  आलेला बळीराजा यंदा वेळेवर पाउस होईल या आशेत होता. परंतु अद्याप मान्सूनच्या पावसाची हजेरी लागली नसल्याने दिवसभर धूळ पेरणी करून दुपारच्या जेवणाच्या वेळी आभाळाकडे पाहत आहेत. गेल्या दोन दिवसापासून जाणवत असलेल्या उकाड्यामुळे रविवारी सायंकाळी आभाळात ढगांची गर्दी झाली असून, पाउस येण्याची आशा शेतकर्यांना लागली आहे. 

सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास हिमायात्नाग्र शहरात पावसाची एन्ट्री झाली असून, १५ मिनिट पाउस झाल्याने नाल्या भरून वाहत होत्या. परंतु हा पाउस शहराच्या बाहेर पडला नसल्याने शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी