४७ जनांचे रक्तदान

स्वारातीम विद्यापीठाच्या रक्तदानशिबीरात
४७ जनांचे रक्तदान
नांदेड(प्रतिनिधी)स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ शिक्षेकेत्तर कर्मचारी संघटनेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात ४७ जनांनी रक्तदान केले. या शिबिराचे उदघाटन विद्यापीठाचे विद्यापीठाचे कुलसचिव भगवंतराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. 

शिक्षेकेत्तर कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष दासराव हंबर्डे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ शिक्षेकेत्तर कर्मचारी संघटनेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन प्रशासकीय इमारतीच्या तळमजल्यावर करण्यात आले होते. या शिबारात कर्मचाऱ्यांसह प्राध्यापक, अधिकार्यांसह ४७ रक्तदात्यांनी रक्तदान करून राष्ट्रीय व सामाजिक कार्य करून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. या उपक्रमासाठी उपकुलसचिव हुशारसिंह साबळे, प्रा. डॉ. गजानन मुधोळकर, प्रा. रुपेश देशमुख, पत्रकार किरण देशमुख यांच्यासह विद्यापीठातील शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. या उपक्रमाचे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तोंडभरून कौतुक केले.  यावेळी वित्त व लेखा अधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे, परीक्षा नियंत्रक डॉ. रवि सरोदे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. अंबादास कदम, कार्यकारी अभियंता अरुण पाटील, जनसंपर्क अधिकारी अशोक कदम, सहा. कुलसचिव डॉ. दिगंबर तंगलवाड, पी. ए. कुलकर्णी, रामदास पेदेवाड,  उपअभियंता तानाजी हुस्सेकर यांच्यासह कर्मचारी संघटनेचे व पतसंस्थेचे पदाधिकारी तसेच अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या शिबाराच्या यशस्वीतेसाठी संघटनेचे अध्यक्ष यांच्यासह सर्व पदाधिकार्यांनी परिश्रम घेतले.          

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी