पाकीट मारणार्यास पकडले

स्टेटबैंकेत पाकीट मारणार्यास रंगेहात पकडून केले पोलिसांच्या स्वाधीन.. बैंक अधिकार्याने केले हातवर
 
हिमायतनगर(प्रतिनिधी)शहरातील भारतीय स्टेट बैंकेत सध्या शेतकरी, शिक्षक, पेन्शनर्स, विद्यार्थी ग्राहकांची झुंबड होत आहे. याचा संधीचा फायदा घेऊन एका शिक्षकाने उचल केलेल्या पगारीवर हात साफ करणाऱ्या चोरट्यास नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. हि घटना मंगळवारी दुपारी घडली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, खरीप हंगाम तोंडवर आल्याने पिक कर्जासाठी शेतकऱ्यांची झुंबड बैन्केत होत आहे. त्यातच शिक्षक, विद्यार्थी, पेन्शनर्स यांचाही यात समवेश आहे. नेहमीप्रमाणे महिनेवारी पगारीची रक्कम उचल करण्यासाठी एका शाळेचा शिक्षक दि.०७ मंगळवारी येथील भारतीय स्टेट बैन्के आला होत. दुपारी २.५ वाजेच्या सुमारास बैन्केतून त्यांनी रक्कम काढली आणि खिश्यात ठेवली. हि संधी व गर्दीचा फायदा घेत एका चोरट्यांनी त्यांच्या खिश्यातून अलगदरित्या हजाराच्या नोटा काढल्या. सुरुवातील काहीच समजले नाही, परंतु सररर.... आवाज आल्याने शिक्षकाने खिश्याकडे पाहिले तेंव्हा नोटा गायब होत्या. बाजूला वळून बघितले तर आपल्या खिश्यातील नोटा ह्या अज्ञात तरुणाच्या हातात दिसून आल्याने लगेच त्यांनी त्याचा हात पकडला. तर बैन्केत आलेल्या अन्य एका ग्राहकाने त्या चोरट्यास चोप दिला. एकच गोंधळ उडाल्याने सर्वजन या घटनेकडे पाहत होते. दरम्यान काही नागरिकांनी येथील शाखाधिकारी किशोरचंद जैन यांना हा प्रकार सांगून पोलिसांना पाचारण करण्याची विनंती केली. परंतु नेहमीच आपल्या तोर्यात वागणाऱ्या हेकेखोर शाखाधिकारी यांनी उलट नागरिकांना हे आमचे काम नाही तुम्ही बाहेर जा... असे फर्मान सोडून हात वर केले. त्यामुळे काही वेळ चांगलाच वाद झाला. मात्र शेतकऱ्यांच्या कामात खोळंबा होऊ नये म्हणून चोरट्यास पडकून नागरिकांनी पोलिसांना पाचारण केले. विचारपूस केली असता चोरटा वेगवेगळे नाव सांगत असल्याने पोलिस गाडी येताच त्यांच्या स्वाधीन करून सुटकेचा निश्वास सोडला. वृत्त लिहीपर्यंत पोलिस डायरीत गुन्हा दाखल झाला नव्हता. 

याबाबत सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक डांगरे यांच्याशी संपर्क केला असता, ते म्हणाले कि, नागरिकांनी पंकेश कामतलाल पारधी, रा. रावत जी.ढोलपूर जी.इंदोर यास आमच्या स्वाधीन केले. परंतु याबाबतची कोणीच तक्रार दिली नाही. म्हणून बैन्केत चोरी करण्याच्या उद्देशाने आढळून आल्यावरून कलम १०९ ची कार्यवाही करण्यात आल्याचे सांगितले.

सुरक्षा गार्ड तैनात करण्याची मागणी
---------------------------
गतवर्षी सुद्धा येथील भारतीय स्टेट बैन्केत एका महिला कर्मचार्याच्या बैगेतील ५० हजराची रक्कम अज्ञात चोरट्याने पळविली होती. चोरटा तर सापडला नाही परंतु येथील बैन्केने ग्राहक, शेतकरी, नागरिकांच्या सह बैन्केच्या सुरक्षेसाठी सुरक्षा गार्ड तैनात करण्याची तसदीही घेतली नाही. त्यामुळे आजही बैन्केत चोरीचा प्रयत्न झाला. हि बाब लक्षात घेता आता तरी बैन्केने येथे बंदूकधारी सुरक्षा गार्ड तैनात करून सुरक्षा वाढवावी अशी मागणी बैन्केत येणार्यांनी केली आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी