वनांचे रक्षकच बनले भक्षक

वनांचे रक्षकच बनले भक्षक ; दस्तगीरवाडी 
परीसरात मारलेल्या रोहीची ना.. दाद ना फिर्याद
हिमातनगर(अनिल मादसवार)तालुक्यातील दस्तगीरवाडीच्या जंगलात शिकार करण्यात आलेल्या रोहीची वनविभागाणे आजपर्यंत ना दाद घेतली ना फिर्याद यामुळे वनांचे रक्षकच भक्षक बनले असल्याची तालुक्यात चर्चा होत आहे.

याबाबत सविस्तर असे कि, दि.०४ जुन जागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला हिमायतनगर वनपरिक्षत्रा अंतर्गत येणार्या दस्तगीरवाडीच्या जंगलात एक रोही पाण्याच्या शोधात पवना तलावाकडे आला होता. पाणी पीण्यासाठी आलेल्या रोह्याला शिकार्यांनी लक्ष करत त्याची दिवसा ढवळ्या हत्या केली व माॅस काढुन नेले. विशेष म्हणजे वनविभागातील काही वनरक्षकांनीही सदरील रोहीच्या मासावर ताव मारल्याचे परिसरातील नागरीक सांगत आहेत. सदरील घटनेची माहीती परीसरात वार्यासारखी पसरली असतांना वनविभागातील कर्मचार्यांनी स्वताच्या बचावासाठी पंचनाम्याचा फार्स पुर्ण केला. परंतु अदयापपर्यत रोहीच्या शिकारी बाबत कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे ज्यांच्यावर वनाच्या रक्षनाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तेच भक्षक बनले असल्याने वनविभागाची प्रतिमा अशा बेजबाबदार कर्मचार्यांमुळे मलीन होत आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांची शिकार करणारांचे मनोबल वाढत आहे. परिणामी वन्य जीवांचेआस्तीत्व धोक्यात आले जागतिक वनदिनाच्या काळातच हा प्रकार घडल्याने सर्व स्तरातून वन अधिकार्याच्या अक्षम्य दुर्लक्षाबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकाराकडे जिल्ह्याचे उपवनसंरक्षक सुमित डोडल यांनी लक्ष देऊन दोषी अधिकारी -कर्मचाऱ्यावर कार्यवाही करून निलंबित करावे अशी मागणी वन्य प्रेमी नागरीकातून केली जात आहे. 

वनविभागाची टाळाटाळ
--------------
या घटनेची माहीती देण्यास वनविभागाचे अधिकारी कर्मचारी टाळाटाळ करत असुन, उडवा उडवीची ऊत्तरे देत असल्याने या भागतील वनपाल, वनरक्षक संशयाच्या भोवर्यात सापडले आहेत. वरीष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन जंगल व जंगलाततील प्राणी वाचवायचे असतील तर घटनेची सखोल चौकशी करून. याप्रकारांचे सत्य जनतेसमोर आणावे आणि शिकार्यांच्या टोळींचा बंदोबस्त करावा. आणि माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्यांची उचल बांगडी करावी अशी मागणी केली जात आहे.

शिकारी टोळीच्या मोरक्याना अधिकारी -कर्मचार्यांचे अभय  
-----------------
गेल्या काही वर्षापासून तालुका परिसरात शिकार्यांची टोळी सक्रिय झाली असून, वन्यप्राण्यांवर पाळत ठेउन शिकार करून तेलंगाना राज्यात माॅसविक्री करणाचा धंदा चालविला आहे. तसेच कळविटाची शिंगे यासह अन्य वन्य प्राण्यांचे मास विक्रीचा गोरख धंदा चालवल्याचे एका शिकार्यास बंदुकीची गोळी लागून मृत्यु झाल्याच्या घटनेवरून स्पष्ट झाले आहे. असे असताना देखील येथील पोलिसांनी सदर प्रकारनावर पडदा टाकण्यासाठी संशयाच्या शिकारीस मयत युवक बंदूक घेऊन गेल्याची नोंद करून अकलेचे तारे तोडल्याचे सर्वश्रुत आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आले असून, शिकारी टोळ्यांना शासनाचे अधिकारी - कर्मचारीच अभय देत असल्यामुळे नागरीकातून तुवर संतापाची भावना बोलून दाखविली जात आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी