वृक्षलागवडीचे योग्य नियोजन करा

वनमहोत्सव कालावधीत वृक्षलागवडीचे सर्वविभागाने योग्य नियोजन करावे - जिल्हाधिकारी काकाणी

-जिल्ह्यात 6 लाख 35 हजार वृक्षलागवडीचे उद्दीष्ट

नांदेड(प्रतिनिधी)पर्यावरणाचे असंतूलन, असमतोल, वाढते प्रदुषण आणि त्यातून होत असलेले पर्यावरणीय बदलाची तीव्रता कमी करण्यासाठी शासनाचे विविध विभाग व लोकसहभागातून येत्या 1 जुलै रोजी “वन महोत्सव” कालावधीत जिल्ह्यात 6लाख 35हजारवृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. या वृक्षलागवडीचे सर्व अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी दिल्या. 

नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन सभागृहात वनमहोत्सव कालावधीत वृक्ष लागवडीच्या आढावा बैठकीत श्री. काकाणी बोलत होते. यावेळी सहायक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी  विकास प्रकल्प किनवटचे प्रकल्प अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड,  अप्पर जिल्हाधिकारी बी. एम.कांबळे विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. जिल्ह्यात शासनाचे विविध विभाग व जनतेच्या सहभागातून 1 जुलै 2016 रोजी वनमहोत्सवात वृक्ष लागवडीचे योग्य नियोजन करावे. वृक्ष लागवडीवर अधीक भरदयावा व त्याच्या संवर्धनाचीही काटेकोर दक्षता घ्यावी. या वृक्षलागवडीने भविष्यातील वातावरण निरोगी राहण्यास मोठी मदत होणार आहे. त्यामुळे वृक्षलागडीच्या दिलेल्या उद्दीष्टापेक्षा अधिक वृक्ष लागवड करावी, असेआवाहनहीश्री. काकाणी यांनी केले.

या वनमहोत्सवात महसूल विभाग- 3 हजार 500, कृषिविभाग- 11 हजार, ग्रामविकास- 62 हजार 500, पशुवैद्यकीय विभाग- 900, नगरविकासविभाग- 6 हजार 600, सहकार व पणनविभाग- 450, उच्च व तंत्रविभाग- 2 हजार 650, गृहविभाग- 2 हजार 200, परिवहन विभाग- 450, विधी व न्यायविभाग- 450, सार्वजनिक आरोग्य विभाग- 1 हजार 800, सार्वजनिक बांधकाम विभाग- 450, जलसंधारण विभाग- 2 हजार 200, आदिवासी विकास विभाग- 2 हजार 200, ऊर्जाविभाग- 4 हजार 400, सांस्कृतिक व पर्यटनविभाग- 450, उद्योग विभाग- 900, जलसंपदा विभाग-450, सामाजिक न्याय विभाग- 450, केंद्रीय राखीव दल मुदखेड- 2 हजार 200, शालेयक्रीडा विभाग- 23 हजार 750, वनविभाग-4 लाख 80 हजार, सामाजिक वनीकरण विभाग- 15 हजार, वनविकासमहामंडळ- 10 हजारया प्रमाणे वृक्ष लागवड करण्याचे उद्दीष्ट निश्चित करण्यात आले आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.  

जिल्ह्यात वन महोत्सवात शासकीय विभागांना दिलेले उद्दीष्ट साध्य करण्यासाठी सर्वविभागाने योग्य नियोजन करुन खड्डे खोदणे, रोपेउपलब्धकरणे व त्याच्याप्रगतीचीमाहितीऑनलाईनभरण्यातयावी. तसेच लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मरणार्थ 3 जूनते 9 जून 2016 याकालावधीत पर्यावरण सप्ताह साजरा करण्यात येत आहे.  5 जून जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून महात्मागांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करावी. या सप्ताहात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत निवडलेल्या गावांना प्राधान्य देण्यात यावे, असेही अप्पर जिल्हाधिकारी श्री.कांबळे यांनी यावेळी सांगितले.


विविध विकास कामांसाठीचा निधी 
शासकीय अधिकाऱ्यांनी वेळेत खर्च करावा  काकाणी   

जिल्ह्यात विविध विकास कामांसाठी जिल्हावार्षिक योजनेतून केलेल्या आर्थिक तरतूदीचे योग्य नियोजन करुन सर्वशासकीय अधिकाऱ्यांनी वेळेत निधी खर्च करावा , असे निर्देश जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी आज येथे दिले.

नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवनात जिल्हा वार्षिक योजना सन 2016-17 करिता मंजूर झालेल्या निधी अंतर्गत प्रशासकीय मान्यता व निधी वितरणाबाबत आढावा बैठक श्री. काकाणी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा वार्षिक योजना सन 2015-16 यावर्षात उपलब्ध करुन देण्यात आलेला निधी, झालेला खर्च, विविध विकास कामांची कामेनिहाय प्रगती, उपयोगिता प्रमाणपत्र याचाही आढावा घेण्यात आला. या बैठकीस सहायक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी  विकास प्रकल्प किनवटचे प्रकल्प अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड,  अप्पर जिल्हाधिकारी बी. एम.कांबळे, जिल्हानियोजनअधिकारीबी.एस.खंदारे, विविध विभागांचे प्रमुख उपस्थितहोते.

जिल्ह्याच्या विकासासाठी विविध योजनांसाठी संबंधीत विभागाने केलेल्या मागणीनुसार जिल्हा वार्षिक योजनेतून आर्थिक निधीदिला जातो. यानिधीच्या खर्चाचे योग्य नियोजन करुन ते वेळेत खर्च करण्याची जबाबदारी संबंधीत अधिकाऱ्यांचीआहे. यावर्षी नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची आचार संहिता लागू होणार आहे. त्यामुळे शासकीय विभागांना निधी खर्च करण्यासाठी कमी कलावधी मिळणार आहे. यासाठी तांत्रिक प्रशासकीय मंजुरीचे कामजून 2016 अखेर पूर्ण करावे असा सूचना श्री. काकाणी यांनी यावेळी केली.

आदिवासी उपयोजनेचा आढावा घेवूनडॉ. भारुड यांनी सर्वशासकीय यंत्रणेनी निधी खर्चाचे आराखडे तयार करुन त्वरीत सादर करावेत. वितरीत केलेल्या निधीतून आदिवासी जनतेच्या सर्वांगिण विकासाच्या कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. विकासकामे पूर्णझाल्यानंतर त्याच्या प्रगतीच्या अहवालासह उपयोगिता प्रमाणपत्रही त्वरीत सादर करावीत. येत्या 1 जुलै रोजी माहूर व किनवट तालुक्यात एक कोटी वृक्षलागवड करण्यात येणार आहे. त्यासाठी गावनिहाय नियोजन करुन सर्वविभागांनी हे उद्दीष्ट साध्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.   

याबैठकीत सन 2016-17 करीता मंजूर तरतूद, प्रशासकीय मान्यता, निधी वितरण नियोजन तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेकडील अखर्चित निधी, प्रादेशिक पर्यटन विकास, श्रीक्षेत्र माहूरगड विकास, केंद्र पुरस्कृत मेगाटुरीझम सर्कीट योजना, ठेवत त्वावरील कामांचा आढावा, जलयुक्त शिवार योजना, लघुसिंचन आदीविषयी आढावा घेण्यात आला. प्रारंभी जिल्हानियोजन अधिकरी श्री.खंदारे यांनी जिल्हावार्षिक योजना अंतर्गत काम निहाय आढावा घेतला.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी