नदी - नाल्याच्या काठावरील शेतकऱ्यांची हजारो हेकटर शेती खरडून गेली

सैराट पावसाने हजारो हेक्टर जमिनी खरडल्या... 
लागवडीचे बियाणे पूर्णतः नुकसानित  
घरात पाणी घुसल्याने अंशतः नुकसान 

हिमायतनगर (अनिल मादसवार) शुक्रवारी दुपारी झालेल्या तास भराच्या सैराट पावसामुळे तालुक्यातील नदी - नाल्याच्या काठावरील शेतकऱ्यांची हजारो हेकटर शेती खरडून गेली आहे. तसेच लागवड केलेले बियाणे जमिनीत दबले असून, शेकडो लोकांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांचे अंशतः नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकारांची महसूल विभागाने दखल घेतली असून, अनेक ठिकाणच्या नुकसानीची पाहणी मंडळ अधिकाऱ्यांनी केली असून, तात्काळ  नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना बियाणे व आर्थिक मदत मिळवून दयावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.


गतवर्षी झालेल्या अल्प पावसाने शेतकरी आर्थिक संकटात आला आहे, यावर्षी चांगला पाऊस असल्याचे सांगितले जात असल्याने मृग नक्षत्रात झालेल्या पहिल्याच पावसावर 90 टक्के शेतकऱ्यांनी कापूस लागवड, सोयाबीन, ज्वारी, मूग, उडिदाची पेरणी केली. आता होणाऱ्या पावसाने भरघोस उत्पादन येईल आणि डोक्यावरील कर्जाचा बोजा कमी होईल या आशेने शेतकरी शेतात घाम गाळीत आहे. दरम्यान दि.24 शुक्रवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास सुसाटवारे व विजांच्या कडकडाटाने पावसाचे आगमन झाले. सुरू झालेल्या पावसाने गती वाढविली आणि बेभान होऊन धो.. धो ... बरसला. जवळपास तासभर झालेल्या या सैराट पावसाने हिमायतनगर शहर, बारसं बु, खडकी, बा, आंदेगाव, सिरंजणी, पळसपूर, डोल्हारी, घारापुर, टेभी, वडगाव ज, सवना ज, बोरगडी, धानोरा, पवना, मंगरूळ, वारंगटाकळी, टेभूणीं, पावनमारी, किरमगाव, वाघी, कामारी, दिघी, सिरपल्ली, कोठा ज. रेणापूर, एकंबा परिसरातील नदी नाले खळवळून वाहिले. तर अनेक तलाव तुंडुंब भरले असून, बंधारे ओसंडून वाहून परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील बांध फोडीत जमीन खरडून गेल्या.    

जवळपास 100 मिलीमीटर झालेल्या पावसामुळे हजारो हेक्टर नाले, नदी, बंधारे, तलावाच्या काठावरील शेत जमिनीचे क्षेत्र पाण्याखाली आल्याने पूर्णतः नुकसान झाले आहे. तर खडकी, आंदेगाव, पवना, हिमायतनगर या गावाला पावसाच्या पुराचा फटका बसल्याने सखल भागातील अनेकांच्या घरात पाणी शिरून अंशतः नुकसान झाले आहे. पुराच्या पाण्याने कोणतीही वित्त अथवा जीवित हानी झाली नसली तरी खडकी बा, घारापुर, आंदेगाव यासह अनेक गवानजीकच्या नाल्यामुळे हजारो हेक्टर शेतकऱ्यांची जमिनीतील बियाणे दबून, जमीन खरडून लाखोंचे नुकसान झाले आहे. दरम्यान पावसामुळे अनेक गावाचे रस्ते बंद पडले होते, हळू हळू पाणी कमी झाल्याने गावचे रस्ते पूर्ववत सुरु झाले आहेत. ज्या ज्या ठिकाणच्या नाल्याच्या काठावरील नुकसान झाले याची पाहणी संबंधित तलाठी यांनी केली असून, सरसम बु. सज्जाचे मंडळ अधिकारी एम.व्ही, खंदारे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांच्या नुकसानीचा अहवाल घेतला आहे. लवकरच हा अहवाल वरिष्ठकड़े पाठविणार असल्याचे त्यांनी प्रस्तुत प्रतिनिधीस बोलताना सांगितले. यावेळी खडकी बा. येथील शेतकरी तथा सरपंच गजानन यलकदरे, महाराष्ट्र राज्य महारथी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष पांडुरंग गाडगे, पत्रकार कानबा पोपलवार, अनिल मादसवार, शेतकरी दिगंबर महाराज, देवराव पवार, नाथ रेखावार, रामराव कावळे, देविदास सूर्यवंशी, किशनराव पाटील, अरविंद भागात, सतीश नारखेडे, संदीप टकले, किशन ठाकरे, गणेश नारखेडे,लक्ष्मण सूर्यवंशी, किशन सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती.       

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी