सर्चरिपोर्टसाठी लुट....

सर्चरिपोर्टसाठी तलाठी - वकिलाच्या दलालाकडून शेतकऱ्यांची होतेय लुट....
हिमायतनगर(प्रतिनिधी)मृग नक्षत्र अवघ्या तीन दिवसावर आला असून, तत्पूर्वी पिक कर्ज व पुनर्गठन करण्यासाठी बैन्केत शेतकऱ्यांची तोबा गर्दी होत आहे. यासाठी लागणाऱ्या कागदपत्राच्या जुळवा जुळविसाठी शेतकरी तलाठी, रजिस्ट्री कार्यालय आणि वकिलाच्या दारी जात आहे. याच संधीचा फायदा घेत त्यांच्या दलालाकडून शेतकर्यांना वेठीस धरले जात आहे. त्यामुळे दुष्काळाच्या छायेत अडकलेला शेतकरी आता पुन्हा दलालाच्या जाळ्यात अडकला आहे.

सतत तीन वर्षापासून तालुक्यातील शेतकरी अवर्षणाने मेटाकुटीला आला आहे. दुष्काळाच्या या भयानक परिस्थितीत शेतकरी होरपळत आहे. तरी देखील आगामी हंगामात चांगला पाउस होईल या आशेने काळ्या आईची ओटी भरण्यासाठी सज्ज झाला आहे. पेरणीच्या चिंतेतून बाहेर निघण्यासाठी शेतकरी बैंक व खाजगी सावकारच्या दाराचे उंबरवठे झिजवल्या शिवाय पर्याय नसल्याने, राष्ट्रीयकृत असलेली भारतीय स्टेट, मराठवाडा ग्रामीण बैन्केकडे कृषी कर्ज व पुनर्गठन करण्यासाठी प्रस्ताव दाखल करून खेटे मारीत आहे. परंतु मागील व यंदाचे असे मिळून लाखाच्या वर कर्ज प्रकरण जात असल्याने बैन्केला सर्चरिपोर्ट सादर करणे गरजेचे असल्याचे सांगून बैन्केचा अधिकारी शेतकर्यांना सर्चरिपोर्ट आणण्याची सक्ती करीत आहेत. नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २.५ लाखाच्या कृषी कर्जास सर्च रिपोर्टची आवश्यकता नाही असे सांगितले जात असल्याने शेतकर्याचे कंबरडे मोडले जात आहे.

याच संधीचा फायदा घेत काही दलालांनी वकील, तलाठी यांच्याकडे दलाली सुरु केली असून सर्च रिपोर्टसाठी लागणाऱ्या कागदपत्रात पीकपेरा, टोच नकाशा, वडिलोपार्जित  जमिनीचे प्रमाणपत्र, विहीर - बोअरचे प्रमाणपत्र, रजिस्ट्री आणि ऑनलाईन बोजा यांचा समावेश आहे. यासाठी तलाठी महाशयांना १२०० आणि वकिलाची फीस १००० ते १५०० हजार आणि रजिस्ट्री कार्यालयात ८०० ते १००० रुपयाचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. स्वतः काम घेऊन गेले तर लवकर होत नाही.. दलालाकडून जायचे म्हणजे कृषी कर्ज मिळविण्यासाठी ३००० ते ३५०० हजारच्या जवळ खर्च करावा लागत आहे. अगोदरच दुष्काळाच्या कचाट्यात अडकलेला बळीराजा तलाठी, वकील, रजिस्ट्री कार्यालयातील दलालाच्या कचाट्यात सापडला आहे. 

शेतकर्यांना या दुष्ठचक्रातून वाचविण्यासाठी बैन्केत थेट शेतकर्यांना कमी कालावधीत व तलाठ्याकडून बोजा चढवून देण्यासाठी जिलाधिकारी सुरेश काकांनी यांनी लक्ष देण्याची मागणी अडचणीत आलेल्या शेतकरी वर्गातून केली जात आहे. एव्हाना शेतकरी हिताच्या गप्पा मारणाऱ्या नेते मंडळीनी तहसीलदार, बैन्केच्या अधिकारी यांना धारेवर धरले नसल्याने नेत्यांचा शेतकर्या विषयीचा पुळका किती बेगडी स्वरूपाचा आहे असा सवालही शेतकरी उपस्थित करीत आहेत.  

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी