सुधा प्रकल्प १००टक्के भरला

भोकरजवळील सुधा प्रकल्प १००टक्के भरला
पावसाच्या पाण्याने बोरगावच्या शेतकऱ्यांचे नुकसान


भोकर (मनोजसिंह चौव्हा ण) बुधवारी दुपार पासुन सुरू झालेल्या पावसाने भोकर तालुक्यात सर्वात मोठा आसणारा सुधा प्रकल्प आणि कांडली येथील लघु तलाव १०० टक्के भरला आहेे. बोरगाव येथील ३५ शेतकऱ्यांच्या शेतात पाणी आल्याने पिकांचे नुकसान झाले असून, दोन दिवसात  ९८•७५ मी. मी. पावसाची नोंद झाली आहे.

भोकर शहरासह तालुक्यात मागील आठवडाभरापासुन रिमझिम तर कधी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतोय २९जूनच्या दुपारपासुन पावसाने दमदार हजेरी लावली रात्रीपर्यंत मुसळधार पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले भोकर तामसा रस्त्यावर आसलेल्या नदीला पुर आल्याने दिड वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती या परिसरात आसलेल्या बोरगावच्या नागनाथ घिसेवाड, साहेबराव लुंगारे, गणेश लुंगारे, बालाजी हुबेवाड, रामचंद्र बोटलेवाड, पांडुरंग जाधव, गोविंद जाधव, शंकर जाधव आनंदराव पाटील, सचिन पांचाळ यांच्यासह ३० ते३५ शेतकऱ्यांच्या शेतात पाणी जावुन पिकांचे नुकसान झाले. दिवशी येथील नदीला पुर आल्याने पुलावरून पाणी वाहु लागल्याने पुलापलीकडे आसलेल्या शाळेत गेलेल्या विद्यार्थींना रात्रीला गावचा संपर्क तुटल्याने शाळेतच मुक्काम करावा लागला थेरबन येथील पाझर तलावही या पाण्यामुळे भरला आहे. आणि या भागातही पाणी शेतात आल्याने कांही शेतकऱ्यांचे नुकसान झाले आसल्याची माहिती आहे पुरामुळे बोरगाव, दिवशी खु.जवळील पुलांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. 

भोकर तालुक्यातील धानोरा लघुतलावात ४२टक्के, आमठाणा तलावात२३टक्के तर इळेगांव, लामकाणी तलावात पाणी आले आहे सावरगांव पाझर तलावही पाण्याने भरत आहे. पावसाच्या पाण्याने कांहीं ठिकाणी नुकसान झाले असले तरी चांगला पाऊस झाल्याने समाधान व्यक्त केल्या जात आहे जुन महिण्यात एकूण ३३७•७५मी. मी.पावसाची नोंद झाली आहे. पावसाळ्यात जुलै, आँगष्ट मध्ये १००टक्के भरणारा सुधा प्रकल्प मागील बारा वर्षानंतर पावसाळयाच्या प्रारंभीच म्हणजे यावर्षी जुन महिण्यात १००टक्के भरल्याची नोंद झाल्याची माहिती लघु पाटबंधारे विभागाचे शेख अजीज यांनी दिली. भोकर शहराला सुधा मधुनच पाणी पुरवठा करण्यात येतो १ जुनला या प्रकल्पात केवळ ४ टक्के पाणीसाठा होता मात्र आता हा प्रकल्प तुडूंब भरल्याने येत्या उन्हाळ्याच्या शेवटपर्यंतच भोकर शहराला भरपूर प्रमाणात पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी