लाभ देण्यास टाळाटाळ

मंजूर घरकुलाचा लाभ देण्यास ग्रामसेवक व गटविकास अधिकार्याची टाळाटाळ
 
हिमायतनगर(प्रतिनिधी)तालुक्यातील मौजे वाघी येथील घरकुलाच्या लाभार्थ्यांना इंदिरा आवास योजनेतून प्रशासकीय मान्यता मिळालेली असताना ऑनलाईन मध्ये व्यत्यय असल्याचे सांगत लाभ मिळवून देण्यास टाळाटाळ केली जात आहे. तात्काळ आमच्या घरकुलाचा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा येथील पंचायती कार्यालयसमोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा लाभार्थ्यांनी दिला आहे.  

अनुसूचित जाती - जमातीच्या प्रवर्गातील नागरिकांना प्राधान्य क्रम तथा प्रतीक्षा यादीतील टक्केवारीच्या चढत्या क्रमांकानुसार घरकुलाचा लाभ दिला जातो. लाभार्थ्यांनी घरकुलास प्रशासकीय मान्यतेचा आदेश प्राप्त झाल्यानंतर उपअभियंता बांधकाम यांनी दिलेल्या डिझाईन प्रमाणे बांधकाम करावयाचे आहे. त्यानुसार तालुक्यातील ११ गावच्या ६१ लाभार्थ्यांना केंद्र पुरस्कृत इंदिरा आवास योजनेसाठी सुधारित वाटप पद्धतीने घरकुलास प्रशासकीय मान्यता मुख्य कार्यकारी अधिकारी जी.प. तथा अध्यक्ष जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा नांदेड यांच्या स्वाक्षरी नुसार ०५ मार्च रोजी देण्यात आली. यासाठी केंद्र शासनाकडून ५३ हजार ५०० तर राज्य शासनाकडून ४२ हजार ५०० अशी एकूण ९५ हजारची रक्कम उपलब्ध होणार आहे. तालुक्यातील मौजे वाघी येथील कांबळे खंडू सखाराम, कांबळे शांताबाई खंडू, कांबळे मारोती केरबा, हनवते देविदास मसाजी या चौघांच्या घरकुलास प्रशासकीय मान्यता मिळाल्याचे सांगून येथील ग्रामसेवकाने बैन्केत खाते काढावयास लावले. खाते कडून त्यांच्याकडे देवून महिना लोटला परंतु अद्याप आमच्या खात्यावर एकही रुपया वर्ग करण्यात आला नाही. याबाबत ग्रामसेवकास विचारणा केली असता नाव ओपन होत नाही तुमचे घरकुल कैन्सल झाले असे सांगितले जात असल्याचे लाभार्थ्यांचे म्हणणे आहे. या प्रकारामुळे सर्व लाभार्थी अडचणीत आले असून, घरकुल मंजूर झाले काम सुरु होईल म्हणून आजही कुडाच्या घरात वास्तव्य करीत आहेत. पावसाला तोंडवर आला असताना पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी व राजकीय नेत्यांच्या हलगर्जी पणामुळे घरकुलास मान्यता मिळूनही आम्हाला प्रतीक्षा करावी लागत आहे. या बाबतची चौकशी करून तत्काळ आमच्या घर्कुलचा प्रश्न सोडवावा अशी मागणी वरील लाभार्थ्यांनी केली आहे. अन्यथा वेळ प्रसंगी लोकशाहीचा मार्ग अवलंबून आमरण उपोषणाचे हत्यार उपसावे लागेल असेही प्रस्तुत प्रतिनिधीसमोर बोउन दाखविले आहे. 

गटारमुक्त गावच्या उदिष्टासाठी शौच्चालयाचे बांधकाम करण्यासाठी ग्रामसेवकाने आम्हाला आग्रह केला. त्यामुळे टक्केवारीने १० ते १५ हजार रुपये काढून शौच्चालय बांधले. रक्कम मागणीच्या वेळेस ग्रामसेवकाने तुम्हाला शासनाची रक्कम मिळणार नाही असे सांगू हातवर केले आहे. आत तसाच प्रकार घरकुलात केला जात असून, नाव समाविष्ठ होऊन मंजुरी मिळाली असताना सुद्धा जाणीवपूर्वक लाभ देण्यास टाळाटाळ करत आहे.
                                        मारोती केरबा कांबळे, घरकुल लाभार्थी, वाघी 
 
उपसरपंच नागोराव देवसरकर, संतोष माने आणि आम्ही चौघे लाभार्थी संबंधित गटविकास अधिकारी यांच्याकडे घरकुल संदर्भात विचारणा करण्यासाठी गेलो. परंतु साहेबांनी आमचे समाधान करण्याचे सोडून, आमच्या पद्धतीने काम करत आहोत. यातील डोकेदुखी तुम्हाला काय माहित. सरपंच साहेब तुम्हाला यांचा जास्तच पुळका असेल तर नांदेडला जिल्हा परिषदेत घेऊन जा असे म्हणून अपमानित करून हाकलून दिले आहे. याची चौकशी करून घरकुलाचा लाभ मिळून द्यावा. 
                                         देविदास मसाजी हनवते, घरकुल लाभार्थी, वाघी.   

तालुक्यात मंजूर झालेल्या सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात पहिल्या हप्त्याची रक्कम जमा झाली आहे. परंतु  येथील ग्रामसेवकाच्या हलगर्जीपणामुळे व बदली झाल्याने चार्ज अन्य व्यक्तीकडे देऊन पलायन करण्यासाठी लाभार्थ्यांना घरकुल मंजूर होऊन लाभ देण्यास टाळाटाळ केली जात आहे. तात्काळ लाभार्थ्यांच्या घरकुलाचा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा सर्व लाभार्थ्यांना घेऊन पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषनाचा मार्ग अवलंबवावा लागला तरी लाभार्थ्यांना हक्क मिळवून देण्यासाठी लढा देईल. 
                                          सौ.ललिताबाई गंगाधर हमंद, ग्रा.प.सदस्य, वाघी.

येथील चौघा लाभार्थ्यांच्या घरकुलास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे, परंतु ऑनलाईन मध्ये नाव ओपन होत नसल्याने त्यांच्या कामात व्यत्यय निर्माण होत आहे. एकाच महिलेचे खाते आले असून, बाकीचे मिळाले नसल्याने कामात अडचण आहे, मी जिल्हा परिषदेला आहे. ओपन झाल्यास त्यांच्या घरकुलाचे काम मार्गी लागेल.                                                ग्रामसेवक खांडरे, वाघी   

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी