अंदाजपत्रकाच्या बगल देत काम उरकण्याचा गुत्तेदाराचा सपाटा

काम पूर्ण होण्यापूर्वीच कामारीचा प्रधानमंत्री रस्ता उखडू लागला
हिमायतनगर (अनिल मादसवार) तालुक्यातील मौजे खिरगाव ते कामारी हा रस्ता प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून करण्यात येत असून, अंदाजपत्रकाच्या बगल देऊन निकृष्ठ पद्धतीने काम उरकण्याचा सपाटा अभियंत्याशी हातमिळवणी करून गुत्तेदाराने लावला आहे. त्यामुळे पुढे पाठ मागे सपाट अशी या रस्त्याची अवस्था होत आहे. आगामी काळात मोठा पाऊस झाला तर तर अर्धवट असलेल्या रस्ता वाहून जाण्याची शक्यता नागरीकातून वर्तविली जात आहे. 

मौजे खैरगाव - कामारी ते पिंपरी हा साडे सहा किलोमीटर लांबीचा रस्ता पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून करण्यात येत आहे. सदरील रस्त्यासाठी अंदाजपत्रकीय किंमत ही 03 कोटी 84 लक्ष एवढी असून, शारदा कन्स्ट्रक्शन कंपनीच्या नावावर या कामाचे टेंडर घेण्यात आले आहे. या कंपनीच्या नावाखाली एक्लारे नामक गुत्तेदार हे नांदेडला राहून निर्मल नामक मुनिमाकरवी हे काम करून घेत आहे. त्यामुळे सदरचे काम हे अतिशय सुमार दर्जाचे होत असून, हार्ड मुरूम, हिरवा दगड व मातीच्या मुक्त वापर केला जात असल्याने पुढे काम चालू तर मागे हे काम उखडत चालल्याचे चित्र दिसून येत आहे. याबाबत परिसरातील अनेक जागरूक नागरिकांनी गुत्तेदाराच्या मुनिमास कामच दर्जा उत्तम व्हावा असे सुचविलेले असतं देखील नागरिकांच्या सूचनेला केराची टोपली दाखवीत मनमानी पद्धतीने काम उरकून देयके उचलण्याची तयारी सुरू केली आहे.

अनेक ठिकाणी रस्त्यावर वापरण्यासाठीचा मुरूम रस्त्याच्या दोन्ही बाजूने अतिशय खोल नाल्या खोदून माती व मुरूम वापरला असल्याचे आजूबाजूच्या शेतात जाणाऱ्या शेतकरी व जनावरांना खोल नाली पार करून जावे लागत आहे. यामुळे ह्या नाल्या जनावरे व माणसाच्या जीवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही. साडेपाच मीटर सरसकट रुंदी असताना अनेक ठिकाणी केवळ 3 ते 4 मीटर रस्ता रुंद करण्यात आल्याचे या भागातील नागरिकांचे म्हणणे आहे. राजकीय वराड हस्ते असलेल्या गुत्तेदाराच्या या कामाची उसाचा स्तरीय चौकशी करून गुणवत्ता पूर्ण काम झाल्यावरच देयके काढावीत अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.

तूर्तास निधी उपलब्ध नसल्याचे कारण सांगितले जात असूनही काम झपाट्याने उरकण्याचा गुत्तेदाराचा सपाटा चालू आहे. कोट्यवधी रुपये खर्चून निर्माण करण्यात येत असलेल्या रस्ता किती काळ टिकेल असा प्रश्न या भागातील नागरिकांना पडला आहे. कारण याच तालुक्यात मागील सह वर्षाच्या काळात करण्यात आलेले पानातप्रधान रस्ते वर्षातच उखडून मातीत मिसळले आज घडीला त्या रस्त्याची कोट्यवधी ऋवयाच्या निधीतून दुरुस्ती करण्यात येत आहे. त्याचा प्रमाणे याही रस्त्याची अवस्था होऊ नये अशीच अपेक्षा या भागातील नागरिक व्यक्त करीत आहेत. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी