अखेर चोरट्यावर गुन्हा दाखल.... शहरातील चोर्यांचा उलगडा होणार..?
हिमायतनगर(कानबा पोपलवार)शहरात मागील काही दिवसापासून चोरट्यांनी धुमाकूळ माजवीत नागरिकांची झोप उडविली होती. दि.०४ जून रोजी रुख्मिणी नगरातील एका घरात शिरलेल्या एका चोरट्यास रंगेहात पकडून नागरिकांनी पोलिसांच्या स्वाधीन केले होते. अखेर त्याच्यावर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, चौकशीतून शहरत झालेल्या चोर्यांचा उलगडा होणार ..? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  

शहरात एकापाठोपाठ एक चोरीच्या घटना घडत असल्याने शहरातील नागरिकांची झोप उडाली होती. असे असताना स्थानिक पोलिस चोरट्याचा बंदोबस्त करण्यात अपयशी ठरत असल्याने कृत.... पाहुत.... कार्यवाही केली आहे.... लवकरच चोरट्यास गजाआड केले जाईल आशय पोकळ अश्वनाने नागरिकांचे समाधान करत होते. पोलिसांचा नाकर्तेपणा नागरिकांच्या लक्षात आल्याने परिसरातील बहुतांश नागरिकांनी आपली सुरक्षा आपणच करण्याचा संकल्प केला. आणि गेल्या आठ दिवसापासून दक्ष राहून रुख्मिणीनगर परिसरात चोरट्याकडून होत असलेल्या प्रयत्न व  हालचाली कडे लक्ष ठेवून होते. त्यानुसार दि. ०४ च्या रात्री वादळी वार्यासह महावितरण कंपनीचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शहरासह सर्व तालुक्यात अंधारात होता. याच संधीचा फायदा घेत सरसम येथील चोरटा विकास परसराम गुंडेकर आणि त्याचे अन्य दोन साथीदार यानी चोरीसाठी हिमायतनगर शहर गाठले. आणि मध्यरात्रीला ११.४५ वाजेच्या सुमारास येथील सावन डाके यांच्या घराजवळील शेडवर एकजण, एकजण ऑटो घेऊन बसता स्थानक परिसरात आणि मुख्य चोरटा विकास गुंडेकर घरावर चढून आत शिरला. त्यावेळी घरातील लोकांनी त्यास पहिले असता समोर आलेल्या डाके यांना ढकलून देऊन छतावर चढून पलायन करण्याच्या उद्देशाने दुसर्या मजल्यावरून उडी मारली होती. यात तो चोरटा जखमी झाल्याने नागरिकांच्या हाती सापडला. आणि शहरातील सर्वच चोर्यांची कबुली नागरीका समक्ष देऊन न मारण्याची याचना करू लागला. शेवटी नागरिकांनी पोलिसांना पाचारण करून त्यास पोलिसांच्या हवाली केले. गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. दि. ०६ जून रोजी सावन डाके यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस डायरीत अखेर पोलिसांनी कलम ३८०, ४२७, ५११ भादवी अनुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गायकवाड, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक एएसआय डांगरे हे करीत आहेत.         

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी