पाणी प्रश्न पेटलेला

गांजेगाव पुलावर पेटलेला पाणी प्रश्न पोलिस व तहसील प्रशासनाच्या मध्यस्तीने सुटला
हिमायतनगर(अनिल मादसवार) विदर्भ - मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीत कैनोल्द्वारे सोडण्यात आलेले पाणी बुदलि बंधार्याजवळ येउन ठेपले. परंतु येथील गेट उघडण्याच्या कारणावरून येथे पाणी प्रश्न पेटला होता. त्यामुळे दि.०७ शनिवारी सायंकाळी पोलिस बंदोबस्त लाऊन प्रशासनाच्या उपस्थितीत दोन गेट काढून पुढील गावाकडे पाणी सोडण्यात आले आहे.
 
नुकतेच इसापूर धरणातून कैनोलद्वारे सोडण्यात आलेले पाणी यवतमाळ - नांदेड जिल्ह्याच्या सीमेववर असलेल्या २० ते २५ गावकर्यांची तहान भागविण्यासाठी उपयोगी पडणारे होते. परंतु   ढाणकी नजीकच्या गांजेगाव पुलापर्यंत पाणी आलेले असताना पाणी साठा राहून आगामी काळातील समस्या सुटावी यासाठी येथील बंधार्याचे गेट अगोदरच लावले होते. सर्व गेट बंद असल्याने खालील गावाकडे पाणी आले नसल्याने कोठा, सिरपल्ली, शेलोडा, येथील सरपंच व शेतकरी ग्रामस्थांनी बंधार्याचे गेट काढून पाणी सोडण्यात यावे या मागणीचे निवेदन तहसीलदार गजानन शिंदे यांना दिले होते. याची दाखल घेऊन शनिवारी सायंकाळी गेट उघडण्यासाठी गेलेल्या प्रशासनाला विदर्भातील काही शेतकर्यांनी कडाडून विरोध केला. त्यामुळे पोलिसांना पाचारण करून पोलिस बंदोबस्तात बांधार्याचे दोन गेट काढून त्यातून २ टी. एम. सी. पाणी सोडण्यात आल्याने, तूर्तास तरी खालील गावातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे. परंतु या पाण्याचा वापर सिंचांसाठी झाला तर पावसाला सुरु होईपर्यंत पाणी टंचाईचा सामना नदीकाठावरील गावकर्यांना करावा लागणार असल्याचे सध्याच्या परिस्थितीवरून दिसून येत आहे. यावेळी तहसीलदार गजानन शिंदे, पोलिस उपनिरीक्षक सुशील चव्हाण, कनिष्ठ अभियंता प्रसन्न सोळंके, मंडळ अधिकारी राठोड, पळसपूर सज्जाचे तलाठी तानाजी सुगावे, जमादार बालाजी लक्षटवार, रामराव पाटील, राजू पाटील, रामेश्वर पिटलेवाड, यांच्यासह विदर्भ, मराठवाड्यातील नागरिक शेतकरी मोठ्या संखेने उपस्थित होते.     

पिण्यासाठी वापर व्हावा म्हणून वीज कनेक्शन तोडले

नुकतेच इसापूर धरणातून कैनोलद्वारे पाणी सोडण्यात आले असून, या पाण्याचा वापर सिंचांसाठी नव्हे तर केवळ पिण्यासाठी झाला पाहिजे. त्यामुळे तहसीलदार यांच्या आदेशाने नदीकाठावरील मराठवाडा हद्दीतील शेतीपंपाचे विद्दुत कनेक्शन महावितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता सोळंके यांनी तोडून वीज पुरवठा खंडित केला. परंतु विदर्भातील काही शेतकर्यांनी विद्दुतपंप सुरु करून पाण्याचा वापर शेतीसाठी सुरु केला होता. त्यामुळे मराठवाड्यातील काही शेतकर्यांनी आमचा सुद्धा वीजपुरवठा सुरु ठेवावा असा आग्रह धरला. आणि यासाठी तर सिरपल्ली येथील एक शेतकर्याने चक्क झाडावर चढून अद्नोलन केले होते. जागरूक नागरिक व ग्रामस्थांच्या मदतीने सदर शेतकर्यास खाली उतरवून परिस्थिती लक्षात आणून दिल्याने समस्या मिटली.

अनेक गावे अद्यापही तहानलेलीच 

पैनगंगा नदी पत्रात ५ टी एम सी पाणी सोडण्यात आले होते, परंतु वाळू माफियांनी उत्खनन केल्यामुळे नदीकाठच्या दिघडी, उंचवडद पर्यंत पाणी येउन पूर्णतः आटले आहे. त्यामुळे अद्याप चातारी, दिघी, घारापुर, बोरी, हिमायतनगर, माणकेश्वर, कोप्रा, पळसपूर, सावळेश्वर, एकम्बां, कोठा, बिटरगाव, सहस्त्रकुंड, मुरली या गावांपर्यंत पाणीच पोहोचले नाही. तर कैनोल्द्वारे सोडण्यात आलेले धरणाचे पाणी बुडाली बंधार्यापर्यंत आल्याने येथे पाणी प्रश्न पेटला होता. या प्रकारामुळे बंधार्याखालील गावात पाणी पोहोचले नसल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला होता, वेळीच प्रशासनाने हस्तक्षेप केल्याने पाणी प्रश्न तूर्तास सुटला आहे. अन्यथा या संतापाचा मोठा उद्रेक होण्याची शक्यता निर्माण झाली होती. परंतु यावरही पैनगंगा नदीकाठच्या विदर्भ - मराठवाड्यातील काही गावात पाणी पोहोचले नसल्याने अनेक गावे अद्यापही तहानलेलीच आहेत. हि बाब लक्षात घेता इसापूर धरणातून सहस्रकुंड पर्यंत पाणी सोडण्यात यावे अशी रास्त मागणी केली जात आहे.

गांजेगाव बंधार्याची व पुलाची उंची वाढवावी

हिमायतनगर - ढाणकी मार्गावरील पैनगंगा नदिवरील डोलारी - गांजेगाव येथील बंधारा पुलाची उंची वाढविने गरजेचे आहे. हा बंधारा गेल्या 15 वर्षापूर्वी बांधण्यात आला असून, त्याची साठवन क्षमता कमी असल्यामुळे हा बंधारा लवकरच कोरडा ठक पडत आहे. त्यामुळे दिवाळीपासूनच पाणी टंचाई जाणवते. तसेच या पुलावरून ऊमरखेड, ढाणकी, गांजेगाव, हिमायतगर वाहतुक चालते. पुलाची ऊंची कमी असलयाने पावसाळयात या पुलावर पाणी वाहते. त्यामुळे पावसाळ्यात अनेकदा हा मार्ग बंद पडून वाहतुक विस्कळीत होऊन विदर्भ - मराठवाड्याचा संपक तुटतो. हि बाब लक्षात घेता शासनाने बंधार्याची व पुलाची ऊंची वाढवावी. अशी रास्त मागणी या भागातील चांदराव वानखेडे, नागोराव शिंदे, सिरपल्ली, डोल्हारी, पळसपूर येथील अनेकांनी केली आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी