कोस्केवार पुरस्कार

श्री कोस्केवार पुरस्काराने गोविंद कदम टेंभीकर सन्मानित 
हिमायतनगर(प्रतिनिधी)ग्रामिता तत्वज्ञान प्रचार आणि प्रसाराचे उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल हिमायतनगर तालुक्यातील मौजे टेंभी येथील गोविंद कदम या युवकाचा श्री कोस्केवार पुरस्काराने नुकताच सन्मान करण्यात आला आहे.

प्रती वर्षाप्रमाणे याही वर्षी ग्रामगीता तत्वज्ञान प्रसारक मंडळ कोल्हारी (ई) तर्फे दि.२१ ते ३० एप्रिल दरम्यान इस्लापूर, हिमायतनगर परिसरातील वेगवेगळ्या गावात संत तुकडोजी महाराजांचे विचार भजन, कीर्तन, प्रबोधनाच्या माध्यमातून पोचविण्यात आले. तसेच त्या त्या गावात स्वच्छता अभियान राबवून दि.३० रोजी संत तुकडोजी महाराजांचा जन्मदिन तथा जयंती उत्सव साजरा करण्यात आला. दरम्यानच्या काळात ग्रामगीतेचा प्रचार प्रसार करून जनसामान्यांच्या मनात उत्साहाचे वातावरण निर्माण करून, समजतील अनिष्ठ रूढी परंपरा पासून परावृत्त केल्या गेले. या कार्यात हिमायतनगर तालुक्यातील टेंभी येथील जयगुरु गोविंद ग्यानबाराव कदम या युवकाने अधिक परिश्रम घेतले. त्यांच्या या कार्याची दाखल घेत संस्थेतर्फे दरवर्षी देण्यात येणारा श्री कोस्केवार पुरस्कार संस्थेचे प्रमुख गोपाळराव महाराज मुळझरेकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष विठ्ठलराव फुलके यांच्या हिमायतनगर येथील संत तुकडोजी महाराज मंदिरात प्रदान करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संभाजी सूर्यवंशी हे होते तर महेंद्र टेंभीकर, विठ्ठलराव कोस्केवार, विठ्ठलराव बुरकुले, एल.पी.कोस्केवार, परमेश्वर अक्कलवाड, परमेश्वर इंगळे, यांची समयोचित भाषणे झाली. याप्रसंगी सौ. द्रोपदाबाई वानखेडे, सौ. अंजनाबाई दगेवाड, सौ.कमलबाई चव्हाण,  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाल महारज यांनी केले तर उपस्थितांचे आभार श्री माने यांनी मानले. यावेळी मोठ्या प्रमाणात गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.   

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी