आकाशवाणीची २५ वर्ष

नांदेड आकाशवाणीची २५ वर्षाची यशस्वी वाटचाल

29 मे 1991 जनसंवादातील प्रभावी माध्यम म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते त्या नभोवाणी केंद्राची सुरुवात या दिवशी झाली होती. मागील 25 वर्षांपासून अविरत, अखंडपणे आकाशवाणीच्या माध्यमातून श्रोत्यांची सेवा सुरु आहे. ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे ब्रिद असलेल्या नांदेड आकाशवाणीने मागील 25 वर्षात प्रसार माध्यमांची सामाजिक हिताच्या दृष्टीकोणातून भूमिका नेहमीच महत्वाची ठरली आहे. भारतात रेडिओची सुरुवात झाली तेव्हा शिक्षण हे मुख्य उद्दिष्ट होते. त्यानंतर मात्र या उद्दिष्टात बदल होत माहिती-ज्ञान आणि मनोरंजन अशी कार्यक्रमांची त्रिसूत्री ठरली. या त्रिसूत्रीच्या माध्यमातून नांदेड आकाशवाणीने देखील गेल्या 25 वर्षाच्या विकासाच्या कालखंडाचा टप्पा यशस्वीरित्या पार पाडला.

8 मे 1988 साली सूचना आणि प्रसारण उपमंत्री कृष्णकुमार,  महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण व नांदेडचे खासदार अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत नांदेड आकाशवाणीची कोनशीला वसरणी येथे रोवण्यात आली. आकाशवाणीचे कार्यालय आणि टॉवरच्या कामास तब्बल तीन वर्ष लागले.  29 मे 1991 साली नांदेड जिल्हा आणि परिसरातील श्रोत्यांसाठी संस्मरणीय दिवस ठरला.  यादिवशी पहिली उदघोषणा झाली. तीन तास प्रसारणास सुरुवात झाली. 30 मे 1991 साली आकाशवाणीला कार्यक्रम अधिकारी म्हणून भीमराव शेळके यांची नियुक्ती झाली.  या केंद्रावर सुरुवातीस सुमारे 50 कर्मचार्‍यांचा प्रचंड असा स्टाफ होता.  

‘हे आकाशवाणीचे नांदेड केंद्र आहे’ असा दमदार आवाज ऐकला की नांदेडकरांचे कान सुखावून जातात. एफ. एम.-101 अंश एक मेगाहर्टसवर नांदेड केंद्र लागते.  पुर्वी तीन तासाचे प्रसारण देणारे नांदेड आकाशवाणी केंद्र आज 3 सभेत पूर्णवेळ प्रसारण देते. या केंद्रावरुन विविध भारती, मुंबई, पुणे केंद्राचे सहक्षेपणही करण्यात येते.
श्रोते आणि पत्रके या सर्वांच्या आधारे खरीखुरी म्हणजे बातमी देण्यावर आकाशवाणीचा भर असतो. त्यामुळे आजही विविध प्रसारमाध्यमांमध्ये आकाशवाणी आणि दूरदर्शन यांच्या बातम्या, किमान ठळक बातम्या ऐकूणच मग लोक टीव्हीकडे वळतात.  बोलीभाषेत संवाद साधल्यासारख्या आणि मिनिटाला शंभर शब्द ही सर्वसामान्य श्रवणक्षमता गृहीत धरुनच बातम्या तयार करणे हेही आकाशवाणीचे वैशिष्ट्य आहे. बातम्यांखेरीज कृषीविषयक, मनोरंजनाचे कार्यक्रम सांगीतिक कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमांचा समावेश असतो. यामध्ये पुन्हा पुन्हा तेच कार्यक्रम नसल्यामुळे श्रोत्यांना रटाळपणा वाटत नाही. राजकारण्यांची वाहवा करणे, त्यांच्याकडून पोपटपंची करणे अशा गोष्टींना आकाशवाणीच्या संहितेत थारा नसतो. आजही मल्टीप्लेक्स, एलईडी हाय डेफीनेशन टीव्ही त्यावरील हजारो वाहिण्या, स्मार्ट मोबाईल, टॅबलेट, इंटरनेट यासारख्या डीजीटल युगात आकाशवाणीने आपले आजही स्थान टिकवून ठेवले आहे. मानवाच्या व्यक्तिगत विकासासाठी सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, आरोग्य व कृषिविषयक अशा अनेकविध क्षेत्रांबाबत जागृती निर्माण करण्याचे काम आकाशवाणी करीत असते. 

‘धीस इज ऑल इंडिया रेडिओ’, किंवा ‘यह आकाशवाणी हे’, ‘बिनाका गीतमाला’ त्यानंतर त्याचे  ‘सीबाका गीतमाला’ असे नामांतर झाले. अमित सयानी या उद़घोषकाला आजही श्रोत्यांच्या विसरले नाहीत . ‘संगीत सरिता’, ‘अस्मिता’, ‘फैजी भाईयों के लिए’ यासारखे कार्यक्रम कित्येक वर्षे लोकप्रियता टिकवून आहेत. नांदेडच्या श्रोत्यांना औरंगाबाद- परभणी आकाशवाणी केंद्रावरील बातम्या आणि इतर कार्यक्रमावर समाधान मानावे लागत होते.  त्यामुळे नांदेडकरांचा हिरमोड होत असे. योगायोगाने आपल्या नांदेडचे भूमिपूत्र डॉ. शंकरराव चव्हाण हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाल्याने या मागणीला पूर्णविराम मिळाला. अशोकराव चव्हाण हे त्यावेळी खासदार या पदावर होते. यामुळे नांदेकरांची अनेक वर्षापासून असलेली मागणी पूर्णत्वास आली. नांदेड आकाशवाणी हे आधुनिक एफएम या तंत्रासह श्रोत्यांना ऐकण्याचे भाग्य लाभले. 

आकाशवाणी केंद्राच्या तांत्रिक बाबीः 
पुर्वी लघुलहरी आणि मध्यम लहरी हे बँड नभोवाणी संचामध्ये समाविष्ट असायचे. यामुळे श्रोत्यांना ऐकताना बरेच अडथळे निर्माण होत असत. मात्र बदलत्या तंत्रज्ञानानुसार वेगवेगळे शोध लागत गेले.  फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन म्हणजेच ऋच् होय. या तंत्रज्ञानामुळे श्रोत्यांना सुस्पष्ट आवाज ऐकता येवू लागला. 101.1 चकन ऑपरेटींग फ्रिक्वेन्सी तर पॉवर ऑफ टीआर 6 किलोवॅट आहे. शंभर मीटर उंच टॉवर आणि या टॉवरच्या केंद्रबिंदूपासून 60 किलोमीटर परिघापर्यंत ऐकू जाईल अशी क्षमता. नांदेडसह हिंगोली, परभणी, वसमत, अहमदपूर, जळकोट तर आंध्रप्रदेशातील निर्मल गावापर्यंतच्या श्रोंत्यांना नांदेड आकाशवाणी केंद्राचा लाभ मिळण्यास सुरुवात झाली.  अचानक विद्युत पुरवठा खंडीत झाल्यास 1) डळपसश्रश ढ/ठ 3 ज्ञु., 2) एुलळींशी णपळीं, 3) झेुशी र्डीिश्रिू ढुे ऋशशवशीी ए-ऊ/ॠ.  या क्षमतेचे जनरेटरची सुविधा आहे. कारण रेडिओ प्रसारणाला एका- एका सेकंदाचे महत्व असते. श्रोत्यांना संदेश ग्रहणास कोणताही अडथळा निर्माण होऊ नये म्हणून येथे 24 तास यांत्रिकी अभियंते कार्यरत असतात. 

पुर्वी ग्रामोफोनवर खापराचे रेकॉर्डस असायचा पण त्याची फुटण्याची भिती फार होती. काही काळानंतर ग्रामोफोन रेकॉर्डसमध्ये सुधारणा होऊन प्लास्टीक कोटेड असलेले रेकॉर्डस बाजारात आले आणि एका गाण्याहून चार ते पाच गाणे ऐकण्याची सुविधा मिळू लागली.  टेपरेकॉर्डस आले आणि आता संगणकाच्या सहाय्यामुळे तर सर्वच काही बदलून गेले. ऑडीओ एडिटींग असो किंवा कोणतेही कार्य असो संगणकाशिवाय पर्याय नाही, अशी स्थिती निर्माण झाली . त्याचप्रमाणे नांदेड आकाशवाणीनेही बदलत्या काळानुसार आपल्यातही बदल केला आहे. 

नांदेड जिल्हा समृध्द व्हावा, नांदेड जिल्ह्याचा विकास व्हावा, जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाचे कल्याण व्हावे ही भूमीका कार्यक्रम अधिकारी भीमराव शेळके यांनी जोपासली.  आकाशवाणीने लाईव्ह कार्यक्रम घेण्यास सुरुवात केली. तेंव्हा सर्वप्रथम माळेगाव यात्रेचा लाईव्ह वृत्तांत, गणपती विसर्जन आणि मग लोकं अगदी विसर्जनाच्या ठिकाणी गर्दी करण्याऐवजी घरी बसून रेडिओवर ऐकणे पसंद करु लागले. निवडणूक निकालाचे लाईव्ह ऐकणे तेथील चित्र श्रोत्यांना घरबसल्या पहायला मिळू लागले. याची पावती म्हणून सामान्य जणांसह जिल्हाधिकार्‍यांनीही कौतुक केले.  आज गणपती विसर्जन आहे, आपण गणरायाला निरोप देत आहोत, आम्ही सिडकोमध्ये आहोत, आता जाऊया आसना पुलाकडे, आम्ही गोवर्धनघाटकडे अशा प्रकारचे लाईव्ह कार्यक्रम दिल्यामुळे नांदेड आकाशवाणीने ‘आँखो देखा हाल’ चा श्रोंत्यांना घेता येऊ लागले.

 दृश्य पटलावर एखादे चित्र उभे करण्यात जेव्हा उद़घोषक यशस्वी होतो ते केवळ श्रोत्यांच्या प्रतिसादामुळेच. किसान वाणीतून संवाद साधताना शेतकर्‍यांना असे वाटते की, आपण जसे काही चावडीवर बसून हितगुज करत आहोत, गप्पा मारत आहोत, शेतीविषयक प्रश्तोत्तरात किसान वाणीच्या माध्यमातून ‘थेट बांधावर’ या कार्यक्रमामध्ये तर शेतकर्‍यांना काम करत असताना कानाला हेडफोन लाऊन असतो तेव्हा शेतकर्‍यांना पीकपरिस्थितीचे वर्णन बसल्या जागी ऐकायला मिळू लागले आणि जणू काही आपण शेतात आहोत, आपल्या डोक्यावर उन्ह आहे, असा भास संध्याकाळच्या कार्यक्रमातही श्रोत्यांना व्हायचा. हे सर्व श्रेय आकाशवाणी माध्यमात काम करणार्‍या टीमचं आहे. संविधानात प्रत्येकाला आपले धार्मिक स्वातंत्र्य मिळवून दिले आहे. तेव्हा आकाशवाणी देखील धार्मिक किंवा अंधश्रध्दा निर्मुलनाचे यासारख्या कार्यक्रमांचा समतोल राखण्याचे कौशल्य म्हणावे लागेल. सध्या कमीत-कमी माणसांवर जास्तीत जास्त बोजा आहे,  कार्यक्रम अधिकारी भीमराव शेळके म्हणतात की, व्यवस्थापनामध्ये जे पाच शब्द आहेत, विश्‍वास, आरोग्यमय वातावरण, क्रोध, सहाय्य करण्याचे अंगी असलेले गुण, ह्या बाबी ज्यांना जमतात तो यशस्वी होतो. आणि याच सूत्राने आकाशवाणीला आज 25 वर्षाची यशस्वी वाटचाल करता आली. पाणी असो, पाऊस असो उन्ह असो, वारा असो आकाशवाणीतील कर्मचारी अगदी वेळेवेर येऊन आपले कर्तव्य बजावत असतात. आकाशवाणीला पब्लीक ब्रॉडकास्टर असे म्हणतात. ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हा मुख्य उद्देश होता. पण बदलत्या प्रवाहानुसार संकल्पना बदलू लागली. 

                           राजू जोंधळे, एम.ए. (एम.सी. अँण्ड जे.) मो. 9960161862

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी