भोकर ते मुंबई लोटांगण आंदोलन सुरु

कर्जमाफी करा या मागणीसाठी शेतकऱ्याचे भोकर ते मुंबई लोटांगण आंदोलन सुरु


भोकर (मनोजसिंह चौव्हाण) राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे या मागणीसाठी २५मे२०१६रोजी दुपारी१वाजेपासून तालुक्यातील धावरी ग्रामपंचायत पासून व्यंकट वाडेकर या शेतकऱ्याने भोकर(धावरी)ते मुंबई मंत्रालय पर्यंत रस्त्यावरून लोटांगण घालत आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात गावातील शेतकरी, महिला-पुरूषानी सहभाग घेतला आहे.

मागील तीन वर्षापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे दुष्काळाचे संकट आले आहे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. मात्र शासन तुटपुंजी मदत देत आहे. त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी यासाठी अनेकांनी आंदोलने केली. मात्र कर्जमाफी करण्याचा निर्णय होत नसल्याचे दिसुन येते संपुर्ण कर्जमाफी करावी. या मागणीसाठी भर उन्हात धावरी येथील युवा शेतकरी व्यंकट उध्दव वाडेकर यांनी भोकर(धावरी)पासून मंत्रालयमुंबई पर्यंत जाण्यासाठी बुधवारी दुपारपासून रस्त्याने लोटांगण आंदोलन सुरू केले आहे. सदरील आंदोलनाबाबत वाडेकर यांनी संबधितांकडे पत्र दिले होते. आंदोलन सूरु करताच महसूल विभागाचे तलाठी विलास गलांडे यांनी याबाबत आम्हाला काही निर्णय घेता येणार नाही. तुमच्या भावना वरीष्ठाना कळवु,तुम्ही आंदोलन मागे घ्या अशी विनंती केली. मात्र वाडेकर यांनी मागणी मान्य होईपर्यंत लोटांगण आंदोलन सुरूच राहणार आसल्याचे सांगितले. या आदोलनात अनेक शेतकरी, महिला-षुरूषांनी सहभाग घेत मुंबई पर्यंत जाणार आहेत असे सांगण्यात आले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी