शेतकर्यांप्रती आपुलकी दाखवा

दुष्काळी परिस्थितीत शेतकर्यांप्रती आपुलकी दाखवा - गटविकास अधिकारी अश्विनी भारुड
हिमायतनगर(अनिल मादसवार) अल्प पर्जन्यामानामुळे भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे कास्तकार आर्थिक संकटात सापडला आहे. आगामी खरीप हंगामात पेरणीच्या चिंतेत पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला लागला आहे. शासनाने दुष्काळी परिस्थितीत कृषी कर्जाचे पुनर्गठन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे पेरणीसाठी लागणारे रासायनिक खते, बी बियाणे खरेदीसाठी बळीराजा कृषी दुकानाकडे वळत आहे. यावर्षी खते - बियाणांचा भरपूर साठ उपलब्ध होणार असल्याने आपल्या दुकानात आलेल्या शेतकर्यांना नाराज न करता आपुलकीच्या भावनेने व्यवहार करावा असे आवाहन गटविकास अधिकारी सौ.अश्विनी भारुड यांनी केले. 

त्या काल दि.१० रोजी येथील पंचायत समिती सभागृहात संपन्न झालेल्या खरीप हंगामाच्या नियोजन आढावा बैठकीप्रसंगी बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या सभापती आडेलाबाई हातमोडे, उपसभापती पंडित रावते, सदस्य वामनराव वानखेडे, उज्ज्वला बिच्चेवार, बालाजी राठोड, सहाय्यक गटविकास अधिकारी तथा प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी विलास गंगावणे, कृषी अधिकारी एम.टी. सुडे, पी.आर.माने, अद्वैत देशपांडे, विस्तार अधिकारी रविराज क्षीरसागर, यावेळी भास्कर चिंतावार, रमेश पळशीकर, मारोती पाटील, श्याम ढगे, यांच्यासह शहरातील परवानाधारक कृषी दुकानदार  उपस्थिती होती.      

हिमायतनगर तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र ४८ हजार ५४३ हेक्टर असून, लागवडी खाली येणारे क्षेत्र ३९ हजार ९२४ आहे. खरीप खालील सर्वसाधारण क्षेत्र हे ३० हजार ७९० हेक्टर आहे. सन २०१६-१७ साठी पुढील प्रमाणे पिकासाठी क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले असून, यात भात ५५ हेक्टर, ज्वारी २३५० हेक्टर, तूर २५०० हेक्टर, मुग ५४५ हेक्टर, उडीद ३६० हेक्टर, तीळ ५५ हेक्टर, सोयाबीन १२१५० हेक्टर, कापूस १६२५० हेक्टर, उस ४५० हेक्टर असे एकूण ३४ हजार ७४० हेक्टर खरीप क्षेत्र आहे. 

यासाठी लागणारे बी - बियाण्यांचा साठा उपलब्ध होणार असून, यात भात - २४.७५ क्वींटल, मका - ६.० क्वींटल, ज्वारी १७६ क्वींटल, तूर ३७५ क्वींटल, मुग ८१ क्वींटल, उडीद ५४ क्वींटल, सोयाबीन ९ हजार ११२ क्वींटल, तीळ ५५ क्वींटल, कापूस ८१ हजार २५० पौकेट अशी मागणी करण्यात आली आहे. तालुक्यात एकूण ११ हजार ९८ मेट्रिक खताची मागणी केली असून, यात युरिया ३ हजार ६५५ मेट्रिक टन, डीएपी २ हजार ७९५ मेट्रिक टन, एमओपी ९८९ मेट्रिक टन, एनपीके २ हजार २२७ मेट्रिक टन, एसएसपी १२३८ मेट्रिक टन, अमोनियम सल्फेट १०८ मेट्रिक टन, कैल्शियम अमोनियम नायट्रेट ४३ मेट्रिक टन, एमओपी ४३ मेट्रिक टन उपलब्ध होणार आहे. 

आज तारखेला तालुक्यात युरिया १९११ मेट्रिक टन, डीएपी ६६९ मेट्रिक टन, एमओपी १६६ मेट्रिक टन, एनपीके १२६९ मेट्रिक टन, एसएसपी ७६० मेट्रिक टन, मिश्र खाते २९१ मेट्रिक टन असा एकूण ५ हजार ६६ मेट्रिक टन खताचा साठा शिल्लक आहे. तसेच शेतकर्यांनी सुद्धा कोणत्याही एकच वाणाच्या बी - बियाणांची मागणी न करता वेगवेगळी वाणाची लागवड करावी. कापसाची लागवड करताना शेताभोवती नोन बीती कापसाची दोन ओळी लावाव्यात जेणे करून गुलाबी बोंड आळीच्या प्रादुर्भाव वाढणार नाही. सोयाबीन बियाणे लागवड करताना बियाणात बुरशीनाशकाची ट्रीटमेंट करावी. तसेच सोयाबीन तूर या अंतर पिक पद्धतीचा वापर करावा असे आवाहन कृषी अधिकारी श्री माने यांनी सभागृहात माहिती देताना केले.  

 यावेळी तालुक्यातील लाभार्थ्यांना शासनाच्या विशेष घटक योजनेतून जुन्या पंचायत समिती इमारतीच्या गोडावून मधून आजवर ३० हून अधिक शेतकर्यांना तिफन, कोळपे, चिमटा, पाठीवरील पंप यासह अन्य कृषी साहित्यांचे वितरण करण्यात आले असून, लवकरच अन्य लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. विशेष घटक योजना २०१५-१६ मध्ये एकूण ८८ लाभार्थ्यांचा समावेश आहे. २० लाभार्थी विहिरीसाठी निवडण्यात आले तर ६८ लाभार्थी इतर बाबीमध्ये समाविष्ठ करण्यात आले आहेत.  

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी