मनरेगा फसवणूक

मनरेगा फसवणूक अंतर्गत सात महिन्यांनी एका तांत्रिक अधिकाऱ्याचा अटकपूर्व जामीन नाकारला
नांदेड(रामप्रसाद खंडेलवाल)नरेगा अंतर्गत मातीनाला बांधकामात खोटे जोब कार्ड तयार करून २७ लाख ८५ हजार ७८४ रुपयाची शासनाची फसवणूक करणाऱ्या एका तांत्रिक अधिकाऱ्याची अटक पूर्व जामीन विनंती जिल्हा न्यायाधीश जी.ओ.अग्रवाल यांनी फेटाळून लावली आहे.विशेष म्हणजे हा गुन्हा दाखल होवून आता ७ महिनांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे.

नांदेडच्या सिंदखेड पोलिस ठाण्यात दिनांक १० ऑक्टोंबर २०१५ रोजी मोहन जगू राठोड यांनी तक्रार दिली होती की,चोरड गावात मातीनाला बांधकाम आणि इतर २५ कामे मनरेगा अंतर्गत झाली.त्यात त्यांचे,त्यांच्या पत्नीचे आणि इतर अनेकांचे खोटे जोब कार्ड बनवून एकूण २५ कामांपैकी १२ कामे अपूर्ण राहिली.त्यात अनेक लोकांवर सिंदखेड भादवीच्या कलम ४०६,४०९,४०८,४७१ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल झाला.काही जणांना या प्रकरणात अटक पूर्व जामीन मिळाला.या प्रकरणात पंचायत समिती माहूरचे तांत्रिक अधिकारी सतीश लिंबाजी जाधव यांचे नाव आरोपी या रकान्यात होते. 

तब्बल सात महिन्या नंतर सतीश लिंबाजी जाधव यांनी नांदेड जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला.त्यात सिंदखेडचे सहायक पोलिस निरीक्षक एम.टी.निकम यांनी से दाखल केला.त्यात तांत्रिक अधिकारी सतीश जाधव यांना अटकपूर्व जामीन देण्यात येवू नये असे त्यात लिहिले आहे.आज सरकारी वकील अड़.विनायक भोसले यांनी जाधव हे या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचा युक्तिवाद मांडून अटकपूर्व जामीन देण्यास विरोध दर्शवला.त्या युक्तिवादास ग्राह्य मानून न्या.अग्रवाल यांनी पंचायत समिती माहूरचे तांत्रिक अधिकारी सतीश लिंबाजी जाधव यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावतांना अश्या मोठ्या रकमेच्या फसवणुकीवर तीव्र ताशरे ओढले आहेत. 
  
बारावीच्या परीक्षेत नापास मुलीने केली आत्महत्या   
०००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००
नांदेड(प्रतिनिधी)बारावीच्या पुरवणी परीक्षेत नापास झालेल्या एका युवतीने आत्महत्या केल्याचा प्रकार किनवट शहरात घडला आहे.

हिराबाई जगजीवन पुरके,राहणार बुधवारपेठ ता.किनवट यांनी दिलेल्या खबरीनुसार ६ मार्च २०१६ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास त्यांची मुलगी किरणबाई जगजीवन पुरके हिचा आदिलाबाद रुग्णालयात मृत्यू झाला.ती बारावीच्या पुरवणी परीक्षेत नापास झाल्याने तिच्या मनावर परीणाम झाल्याने विषारी औषध पिल्याने तिस औषध उपचार कामी सरकारी दवाखाना अदिलाबाद येथे दाखल केले असता उपचार चालु असतांना मरण पावली आहे.किनवट पोलिसांनी किरणबाईच्या मृत्यू प्रकरणी अकस्मात मृत्यू दाखल केला आहे.तपास पोलिस नाईक शेख हे करीत आहेत. 
 
ज्ञानेश्र्वर नगर भागात ६९ हजारांची चोरी झाली 
०००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००
नांदेड(प्रतिनिधी)ज्ञानेश्र्वर नगर,नांदेड येथे एका सेवानिवृत्त माणसाचे घर फोडून चोरट्यांनी ६९ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.

रत्नाकर भालचंद्र वाळवेकर रा. ज्ञानेश्र्वर नगर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार २१ एप्रिल २०१६ च्या सायंकाळी ६ वाजेपासून ते २४ एप्रिलच्या सकाळी ९ वाजेदरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दाराचे कुलूप तोडुन आत प्रवेश केला आणि घरातील रोख रक्कम ४० हजार रुपये आणि चार सोन्याच्या अंगठ्या २९ हजार रुपयांच्या चोरून नेल्या आहेत.भाग्यनगर पोलिसांनी अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.तपास पोलिस नाईक आलेवार हे करीत आहेत.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी