जागतिक ग्रंथ दिन

मानवी जीवनाचे सार्थक करण्यासाठी पुस्तकाची संपती महत्वाची - बस्वराज कडगे

नांदेड(प्रतिनिधी)जिवनामध्ये किती संपती कमवली हे महत्वाचे नसुन आपण किती पुस्तके वाचली याचे महत्व जास्त आहे. पुस्तकाने माणुस प्रग्ल्भ होतो. मानवाचे जिवनात खरी संपती हे पुस्तकेच  आहेत असे मत बस्वराज कडगे यांनी व्यक्त केले.

ते जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय नांदेड येथे आयोजित जागतिक ग्रंथ दिनानिमित्त ग्रंथप्रदर्शन व व्याख्यानात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. गाडगे महाराज यांचेकडे कुठलीही संपती नसतांना त्यांनी आज जे संगळयांच्या मनावर मनोराजय गाजवले ते फक्त ग्रंथामुळे असा उल्लेख करत थोर महापूरूषांचे दाखले देत उपस्थितांना ग्रंथाचे महत्व पटवून दिले.

श्री कारले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनात ग्रंथाचे महत्व कशाप्रकारे होते. हे सांगताना म्हणाले की, जर आपल्याकडे 10 रूपये असतील तर त्यातील 5 रूपयाचे पुस्तक घ्यावे. आणि बाकी 5 मध्ये चरितार्थ चालवावा असा बाबासाहेबांचा संदेश उपस्थितांना दिला. आरती कोकुलवार यांनी उपस्थितांना ग्रंथामुळे ज्ञानात कशी भर पडते यावर मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे उदघाटक श्री बस्वराज कडगे प्रमुख पाहुणे कार्लेसर व आरती कोकुलवार हे होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री अजय वटटमवार यांनी केले. आभार प्रदर्शन श्री संजय पाटील यांनी केले. कार्यक्रमासाठी मयुर कल्याणकर, ओंकार कुरुडे,लक्ष्मण शेनेवाड, संजय मस्के, बुधेवार,रोहिदास इंगोले,सुजाता वडजे इ.उपस्थित हेाते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी