इसाई देवीच्या उत्सव

अखंड हरिनाम व संगीत रामायण ज्ञानयज्ञाने वाळकी येथील इसाई देवीच्या उत्सवात सुरुवात
 
हिमायतनगर(प्रतिनिधी)हदगाव - हिमायतनगर तालुक्याच्या मध्यभागी असलेल्या मौजे वाळकी(बा.) येथील इसाई देवीच्या यात्रा उत्सवाच्या मिनित्ताने अखंड हरिनाम व संगीत रामायण ज्ञान यज्ञास दि. २२ एप्रिल पासून थाटात सुरुवात करण्यात आली आहे.

या अप्ताहास दि. २० पासून सुरुवात करण्यात आली असून, पहिल्या दिवशी देवीचा अभिषेक, महापूजा व आरती करण्यात आली आहे. यावेळी दर्शनसाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. तर दि. २१ रोजी सकाळी गणेश पवार यांच्या भारुडाचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर इसाई देवीची छबिना उत्सव व आरत्या आणि देवीच्या उत्सवा निमित्ताने सौ.संगीताबाई पाटील सोलापूर यांच्या वतीने महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला. सात दिवस चालणाऱ्या या सप्ताहात सकाळी ४ ते ६ काकडा भजन, सकाळी ७ ते १० ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी १ ते ४ राम कथा, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ व रात्री ८.३० ते १०.३० या वेळेत हभप महाराजांचे हरीकीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २२ रोजी हभप. संतोष महाराज पळसोना आणि दि. २३ रोजी हभप.ज्ञानेश्वर महाराज जालना यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला आहे. दि.२४ रोजी हभप.सुरेश महाराज पोफळी, दि.२५ रोजी हभप.सौ.मीनाताई हिपळणीकर, दि. २६ रोजी हभप.दासा महाराज रातोळीकर, दि. २७ रोजी हभप.किशन महाराज हिप्परगेकर, तर दि.२८ एप्रिल रोजी हभप. श्यामसुंदर गिरी महाराज आष्टी यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होणार असून, यांच्या मधुर वाणीतून उपस्थितांना भक्तीचा मार्ग दाखविला जात आहे.

 
दि.२२ पासून रामायनाचार्य हभप.पंजाब महाराज चालगणीकर यांच्या मधुर वाणीत रामकथेला सुरुवात झाली असून, व्यासपीठ हभप.केशव विश्वनाथ कदम महाराज सांभाळत आहेत. तर त्यांना मृदंगाचार्य म्हणून हभप.माधव महाराज मरसूळकर, गायनाचार्य हभप.प्रकाश महाराज, रामराव महाराज, गंगाधर महाराज, भीमराव महाराज, पांडुरंग महाराज, चौपदर हभप.प्रकाश महाराज आमगव्हाणकर, तर वाळकी, धानोरा, शिवानी, कोपरा, वाळकी बु, दगडवाडी, टाकराळा, करारी, धोतरा, हरडफ, आष्टी, कोळेगाव, कंजरा आणि पंचक्रोशीतील भजनी मंडळी सहकार्य करीत आहेत. सदर रामकथेला गावकरी महिला - पुरुष भक्तांचा प्रतिसाद मिळत असल्याचे कार्यक्रमातून दिसून येत आहे. सात दिवसानंतर दि.२९ एप्रिल रोजी कार्यक्रमाचा समारोप महाप्रसादाच्या कार्यक्रमाने होणार आहे. या धार्मिक कार्यक्रमात परिसरातील भाविक भक्तांनी उपस्थित राहून शोभा वाढवावी असे आवाहन गावकरी व संयोजक मंडळीच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी