निवड

पहिल्या नगराध्यक्षपदी अ. अखिल तर उपनगराध्यक्षपदी सौ. सविता पाटील

हिमायतनगर(अनिल मादसवार)गेल्या दि.१९ रोजी नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल झाल्यानंतर पहिल्या नगराध्यक्षाच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर दि.२५ रोजी काँग्रेसचे वार्ड क्रमांक ३ मधून निवडणून आलेले उमेदवार अ. अखिल अ. हमीद तर उपनगराध्यक्षपदी सौ.सविता पाटील यांची निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीनंतर ढोल तश्याच्या गजरात फटक्याची आतिषबाजी करून माधवराव पाटील यांचा विजय असो अश्या जयघोषाने जल्लोष करण्यात आला. 

नगरपंचायतीच्या निवणुकीत मतदारांनी काँग्रेस पक्षाला १० तर शिवसेनेला ४, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला २ तर अपक्षाला एका जागेवर निवडून दिले. यात काँग्रेस पक्षाचे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित झाले असल्याने आणि सेनेकडे बहुमत नसल्याने काँग्रेस पक्षाचाच नगराध्यक्ष होणार हि काळ्या दगडावरची रेष होती. यात काँग्रेसकडून तरुण तडफदार युवक म्हणून अ.अखिल अ.हमीद यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आल्याने अ.अखिल अ.हमीद भावी नगराध्यक्ष तर उपनगराध्यक्षपदी सौ.सविता अनिल पाटील होणार... केवळ औपचारिकता बाकी या मथळ्याखाली नांदेड न्युज लाईव्हने वृत्त प्रकाशित केले होते. 

दरम्यानच्या काळात स्वीकृत सदस्य वाढविण्याच्या उद्देशाने झालेल्या राजकीय हालचालीत राष्ट्रवादीचे दोन उमेदवार व एक अपक्ष यांची आघाडी करण्यात आली. दि.२५ सोमवारी रोजी झालेल्या नगराध्यक्ष निवडीत पीठासीन अधिकारी आवीशकुमार सोनोने यांच्या उपस्थितीत हात उंचावून मतदान घेण्यात आले. यावेळी अ.अखिल यांना १३ मते तर एक नगसेविका अनुपस्थित असल्याने रामभाऊ ठाकरे यांना ३ मते पडली. यातून १० मते जादा असल्याने अ.अखिल अ.हमीद यांची नगराध्यक्षपदी निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. तर दुपारी उपनगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसकडून सौ. सविता अनिल पाटील सेनेकडून विनायक मेंडके यांनी नामांकन दाखल केले होते. सविता पाटील यांना १३ तर मेंडके यांना ३ मते मिळाल्याने उपनगराध्यक्ष पादाची माळ वार्ड क्रमांक १० च्या नगरसेविका सौ. सविता अनिल पाटील यांच्या गळ्यात पडली. यावेळी तहसीलदार गजानन शिंदे, कार्यालईन निरीक्षक मालचापुरे, लिपिक महेमूदसाब बंदगी यांच्यासह नगरपंचायतीचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. एकूणच दि.२६ जानेवारीचा पहिला झेंडा काँग्रेसचा नवनिर्वाचित नगरसेवक फडकविणार आहे. 

या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे माजी आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी अभिनंदन करून पुढील कार्याच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी ढोल तश्याच्या गजरात मिरवणूक काढून फटक्याची आतिषबाजी करण्यात आली. याप्रसंगी तालुकाध्यक्ष विकास पाटील देवसरकर, जी.प.सदस्य सुभाष राठोड, नाजीम बैन्केचे संचालक गणेश शिंदे, जनार्धन ताडेवाड, चांद भाई यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवक व काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते. आज झालेल्या निवडीचा राजकीय अंदाज नांदेड न्युज लाईव्हने दि.१९ रोजीच वर्तविला होता. तो तंतोतंत खरा ठरल्याने अनेकामधून न्युज लाईव्हचे अभिनंदन केले जात आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी