चोरटे सक्रिय

हिमायतनगर शहरात चोरटे सक्रिय... झोपलेल्या महिलेचे मंगळसूत्र पळविले


हिमायतनगर(प्रतिनिधी)गेल्या काही दिवसापासून हिमायतनगर शहरात चोरटे सक्रिय झाले असून, दि.०१ डिसेंबर रोजी चार ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाला. एका ठिकाणी चोरट्या सोबत झटापट एका ठिकाणी काही युवकांनी पाठलाग केला. एवढ्यावरही समाधान झाले नसलेल्या अज्ञात चोरट्याने गाढ झोपेतील दोन महिलेच्या गळ्यातील मनीमंगळसूत्र पळविले आहे. या घटनेमुळे शहरातील नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिस झोप काढत असल्याचा आरोप नागरीकातून केला जात आहे. 

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, काही दिवसापासून तामिळनाडू, आंध्रप्रदेशात सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे रात्रीला थंडी तर दिवसा गरमी होऊ लागली आहे. तसेच रात्र मोठी आणि दिवस लहान झाल्यामुळे १० नंतर सर्वच रस्ते सुनसान होत आहेत. याच संधीचा फायदा घेत काही भुरट्या चोरट्यांनी उच्छाद मांडला असून, रात्रीला नागरिक झोपेत असताना चोरी करून पोलिसांना आव्हान देत आहेत. सध्या हिमायतनगर येथील पोलिस निरीक्षकाचे पद रिक्त असल्याचे पोलिस ठाण्याचा कारभार प्रभारीवर चालू लागल्याने चोरटे सक्रिय झाल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. आसाच काहींसा अनुभव शहरातील बजरंग चौक भागातील अमोल धुमाळे नामक या युवकास आला आहे. दि.०१ च्या रात्रीला मित्रासोबत बाहेर गेलेला युवक रात्री १२.३० वाजेच्या सुमारास घरी आला. त्यावेळी घराचे दार उघडे दिसले, सदर युवकाने वडिलास आवाज दिला असता आत घुसलेला अज्ञात चोरटा समोर आला. तू कोण आहेस असे म्हणत पकडण्याचा प्रयत्न केला असता धक्का - बुक्की करून पळ काढला. त्यावरही युवकाने अज्ञात चोरट्याचा पाठलाग केला मात्र तो फरार होण्यात यशस्वी झाला. यानंतर त्या चोरट्याने परमेश्वर गल्ली परिसरातील काही घरात घुसण्याचा प्रयत्न केला तर एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरले. त्यानंतर पोलिस स्थानकाच्या पाठीमागील आडे नामक व्यक्तीच्या घरात घुसून चोरीचा प्रयत्न केला, येथील घरमालकांच्या सतर्कतेने चोरट्याचा डाव फसला. तर चौथ्या ठीकाणी आंबेडकर नगर भागातील आनंद संभाजी हनवते यांच्या घरातील सर्वच जन गाढ झोपेत असताना मध्यरात्रीला त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील मनी - मंगळसूत्र व लावा कंपनीचा मोबाईल असा अंदाजे ५१०० रुपयाचा माल लंपास केला. याबाबत केवळ एका फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून हिमायतनगर पोलिस डायरीत अज्ञात चोरट्यावर कलम ४५७, ३८० भादवी अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत पोलिसांशी विचारणा केली असता केवळ एका ठीकाणी चोरी झाली, मात्र ती सुद्धा खरी आहे कि नाही असे सांगून, आकलेचे तारे तोडले आहे. त्यामुळे येथील पोलिस स्थानकाचा कारभार रामभरोसे चालत असल्याचे दिसून येत आहे. तर प्रत्यक्ष ज्यांच्या घरी चोरटे आल्याची माहिती नागरिक निर्भीडपणे सांगून पोलिसात तक्रार देवूनही काही फायदा होत नसल्याचे बोलून दाखवीत आहेत. 

मागील अनेक चोर्यांचा तपास गुलदस्त्यात 
----------------------------------- 
मागील दोन वर्षात हिमायतनगर शहर परिसर, आखाड्यावर व कुलूप असलेल्या घरात मोठ - मोठ्या चोर्या झाल्या. या चोऱ्यांच्या तपासासाठी तत्कालीन पोलिस अधिकार्यांनी, उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली श्वान पथक, ठसे तज्ञांना बोलावून विविध भागात तपास केला. मात्र अजूनही याचा काहीच तपास लागला नाही. त्यामुळे चोरीच्या घटनांचा तपास करण्यात पोलिस प्रशासन कमी पडत असल्याचा आरोप चोरीमुळे नुकसानीत आलेल्या नागरीकातून केला जात आहे. खरे पाहता पोलिसांकडे चोरटे, पाकीटमार, गुन्हेगार, अवैध्या धंदेवाले, यासह संशयितांची यादीच असते. कोणता गुन्हा कश्या पद्धतीचा यावरून पोलिसांनी तपास करावयाचे असते. परंतु आगावूची झंझट कश्याला म्हणून बहुतांश पोलिस अधिकारी व कर्मचारी कर्तव्यात कसून करीत असल्याने चोरट्याचे फावले जात आहे. तामसा परिसरात एका धान्य गोडावूनच्या चोरट्यांचा अल्पावधीतच तपास लावण्यात आला. तर हिमायतनगर तालुक्यात घडलेल्या चोरीच्या घटनांचा तपास वर्षानुवर्ष होऊन सुद्धा का लागत नाही हा प्रश्न अनुत्तरीत आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी