हिमायतनगर परिसरात नंदीवाल्याचे आगमन

गळ्यात बघा घुंगरु गुबु-गुबु वाजतोय... मालकाच्या इश्यार्‍यावर नंदी कसा वागतोय !

नांदेड(अनिल मादसवार)कडाक्याच्या थंडीत सकाळच्या प्रहरी नंदीबैलवाल्यांचे जिल्ह्यातील हिमायतनगर शहरात आगमन झाले असून, कोवळ्या उन्हाची उब आणि नंदीचे घुंगरू व ढोलकीची गुबुगुबू आवाजाने अनेकांना महाराष्ट्राच्या सामाजिक संस्कृतीच्या परंपरेचे दर्शन घडून येत आहे. 

थोर साधुसंताची भुमी असलेल्या महाराष्ट्राला स्वतहाची अशी सांस्कृतीक आणि वैभवशाली परंपरा आहे. या परंपरांची जपवणुक आजच्या धका-धकीच्या जिवनात देखील प्रत्येक महाराष्ट्रीयन मराठी माणुस आप-आपल्या परिने करतांना दिसतोय. अनेक सन-उत्सव, यात्रा महोत्सव आणि पारंपारीक कार्यक्रम आजही महाराष्ट्रामध्ये मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरी होतात. कितीही वैज्ञानीक प्रगती मानसांनी केली तरी पारंपारीक कार्यक्रमातील रस व माधुर्य आजही कायम आहे. वासुदेव, गोंधळी, संबळ वादक, अदिवासी नृत्य, बंजारा नृत्य, लेझीम, वाघ्या मुरळी, सनई वादन, आदिंसह नंदिवाल्यांची फेरी हे सर्व महाराष्ट्राच्या संस्कृतीक परंपरेचे दर्शन घडवीतात. आज काहीप्रमाणात या कलांचा लोकांना विसर पडु पहात आहे. परंतु जर असा कार्यक्रम कुठे रस्त्यावर किंवा चौकात असेल तर त्या टिकाणी अबाल वृध्दासह तरुण युवक नौकरदार सगळेच थांबतात आणि कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतात. 

असाच एक प्रसंग दि. २६ शनिवारी सकाळी 8 वाजता हिमायतनगर शहरातील प्रभाग क्रमांक ०१ मधील वरद विनायक तथा शनि मंदिराकडे जाणार्या रस्त्यावर दिसून आला आहे. गेल्या काही दिवसापासून पडू लागलेल्या कडाक्याच्या थंडीने सर्वच अबल वृद्ध हे कोवळ्या उन्हाची उब मिळविण्यासाठी बसले होते. अचानक घुंगराचा आवाज ऐकू आला. वळून पाहताच काय बर्याच वर्षानंतर यवतमाळ जिल्ह्यातील गोकुळनगर ता.वणी येथून तालुक्यातुन आलेले गुरव समाज बांधव आणि मारोती नावाच्या नंदिबैलासह ढोलकीवर गुबुगुबू वाजवत येत होता. या आवजाने शेकडो बालके, अबाल वृद्ध, मुले - मुली व कामाला जाणार्यांना आपल्याकडे आकर्षित केले. कडाक्याच्या थंडीत कोवळ्या उन्हाची उब त्यात ढोलकीचा गुबु-गुबु असा आवाज आणि नंदीबैलांचा आकर्षक पेहराव घुंगरुंची रुणझुण ढोलकीची ढुमढुम एैकुन प्रत्येक जन कुतुहलाने गोलाकार थांबले. आणि जोशी बुवांनी आपला कार्यक्रम सुरु केला. पावने चार क्विटंल वजन असलेल्या नंदिचे चारीपाय स्वतहाच्या मांडीवर ठेवने, तोंडात माण घालणे, मांडीवर लंगडी खेळणे, पोटावर पाय देणे, चष्म्यावाल्याचे, टोपीवाल्यांचे, म्हातार्‍याचे, टक्कल पडलेल्याचे, नवविवाहीताचे, व्याहयाचे नाव ओळकणे, दोन पाय मांडीवर ठेऊन नाचने, दोन पाय जमिनीवर एक पाय मांडीवर एक पाय खांद्यावर ठेवणे, चित्रपटाती गान्यातील ठेक्यावर नाचने, दारु पिणारा ओळखणे, सखुबाईला, सदाशिव, मिनाताईला, मिशावाला, बिनमिशावाला, ल्गानापुर्वी बायकोला स्वप्नात पाहणार्यासह मोना मॅडमला ओळखणे हे आणि ईतर अनेक मनोरंजनाचे व तोंडात बोट घालायला लावणारे आश्चर्यजनक खेळ नंदिवाल्याच्या या नंदिनीं गावातील चौका - चौकात केले. या नंदिचे वय वर्ष ३ असल्याचे सांगून चंद्रपूरच्या महाकालीचा सोडलेला असल्याचे नंदिचे मालक संदीप गजर यांनी नांदेड न्युज लाईव्हशी वार्तालाप करतांना सांगीतले. 

संपुर्ण महाराष्ट्र, विदर्भासह गुजरात, मध्यप्रदेश, तेलंगाना, आंध्रप्रदेश कर्नाटक, इत्यादी प्रांतत देखील ते आपले कला आणि गुण दाखवत असतात. त्यांच्या आजोबा - पंजोबापासुन परंपरेने त्यांनी हा रिवाज स्विकारला असुन, मुक्या प्राण्याला ऐवढ शिकवीणारे आम्ही मात्र शासनाकडुन उपेक्षीत असुन, शासनाकडुन कसलीच मदत किंवा आमच्या मुला बाळांसाठी शिक्षण किंवा इतर कोनत्याही गोष्टी मिळत नसल्याची खंत संदीप ताराचंद गजर वय २७ वर्ष यांनी व्यक्त केली. गावोगावी भटकंती करत फिरणारा हा समाज खरचं महाराष्ट्राच्या सांस्कृतीक परंपरेला जोपासणारा एकमेय अव्दीतीय समाज आहे. शासनाने त्यांच्या उत्थानासाठी प्रयत्न करणे काळाची गरज आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी