आजी- माजी आमदारांची प्रतिष्ठा पनाला

काँग्रेस - सेनेच्या तिकीट वाटपावरून कही ख़ुशी - कहीं गम 

हिमायतनगर(अनिल मादसवार)नगर पंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून, प्रमुख राजकीय पक्ष असलेल्या काँग्रेस व शिवसेनेत तिकीट वाटपावरून अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याच्या भावनेने तर काही उमेदवारी पदरात पडून घेण्यात यशस्वी झाल्याने कार्यकर्त्यामध्ये कहीं ख़ुशी कहीं गम असे चित्र चौकाचौकात सुरु असलेल्या चर्चेवरून दिसून येत आहे.

हिमायतनगर नगर पंचायतीत शिवसेना आणि काँग्रेस पक्षाच्या उमेदवारामध्ये सरळ लढत होणार असून, दोन्ही पक्षांच्या निष्ठावंत कर्त्यांनी पक्षाची उमेदवारी मिळेल या आशेने उमेदवारी दाखल केली होती. परंतु उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अचानक घडलेल्या राजकीय घडामोडीवरून पक्षाची उमेदवारी मिळो अथवा न मिळो याची अशा न बाळगता अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. याचा फटका अधिकृत उमेदवाराला सहन करावा लागण्याची शक्यता दिसून येत आहे. काँग्रेस पक्षाने वार्डातील इच्छुक उमेदवारांना डावलून दुसर्या वार्डातील उमेदवार लादल्याने संबंधित प्रभागातील इच्छुक उमेदवारावर अन्याय झाल्याच्या भावनेने संतप्त कार्यकर्ते सुडाची भाषा वापरात आहेत. तर शिवसेनेने निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून उपर्यांना संधी दिल्याने शिवसैनिकांची गुपचिळी काय चित्र निर्माण करणार हे आगामी काळात दिसणार आहे.  

पक्षांची अधिकृत उमेदवारी मिळविण्यासाठी " फिल्डिंग " लावणाऱ्या कार्यकर्त्यांना ऐनवेळी डावलल्याने दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी स्थानिक पक्ष नेतृत्वाला " कस " लावावा लागणार आहे. अनेकांची मनधरणी करण्याचे प्रयत्न चालू झाले आहेत. नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची तर्ख २८ डिसेंबर असल्याने त्या नंतर दोन्ही पक्षांच्या लढतीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.  

अमर राजुकारांची घोषणा ठरली वल्गना
-----------------------------------
विधानपरिषद सदस्य अमर राजूरकर यांनी नुकत्याच इच्छुक कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेवून हिमायातनगर येथे दुसर्या वार्डातील उमेदवार लादणार नाही. असे ठोस आश्वासन देत इच्छुकांना संधी देणार असल्याची घोषणा केली होती. परंतु अनेक प्रभागामध्ये त्याच वार्डातील निष्ठावंत इच्छुक उमेदवारांना डावलून दुसर्या वार्डातील उमेदवार आयात करून उमेदवारी दिल्याने अमर राजूरकर यांची घोषणा वल्गना ठरली आहे. त्यामुळे नाराज झालेल्यांचा फटका कॉंग्रेस पक्षाला व विधान परिषदेचे सदस्यपद मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या राजूर करांना घातक ठरणार आहे. 

पाणी पुरवठा योजना पाण्यात घालणाऱ्यास शिवसेनेची उमेदवारी 
-----------------------------------
हिमायतनगर शहराची २.१८ लाख ६६ हजारची पाणी पुरवठा योजनेच्या सुरुवातीलाच ६ लाखाचा अपहार करणाऱ्या तत्कालीन अंगठे बहाद्दर महिला सचिवास शिवसेनेने उमेदवारी बहाल केली आहे. यामुळे शहरातील नागरिकही सदरील उमेदवारास पाण्यात पाहत असून, या उमेदवारामुळे शिवसेनेलाही याचा दगाफटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी