बिबट्याने केली वासराची शिकार

टाकराळा परिसरात बिबट्याने केली वासराची शिकार...परिसरात भीतीचे वातावरण


नांदेड(अनिल मादसवार) हिमायतनगर तालुक्यातील मौजे टाकराळा शिवारात बिबट्याने एका वासराची शिकार केल्याची घटना दि.१२ च्या मध्यरात्रीला घडली आहे. या घटनेमुळे शेतकरी व गावकर्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शेतकर्याने जागलीवर जाने सोडले आहे. 

याबाबत सविस्तर असे कि, नांदेड - किनवट रस्त्यावर असलेल्या तालुक्यातील मौजे टाकराळा गाव हे तेलंगाना - मराठवाड्याच्या जंगलाच्या पायथ्याशी वसलेले आहे. यावर्षी अल्प पावसामुळे जंगलातील झाडांची पांगली होऊन जंगल भकास होत असून, पाणवठे आटल्याने जंगलात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. त्यामुळे तहानलेले वन्य प्राणी मानवी वस्तीकडे किंवा शेती आखाड्यावर पाण्याच्या शोधात भटकत आहेत. अशीच भटकंती करणारा एका बिबट्या टाकराळा येथील शेतकरी बालाजी किशनराव शिंदे यांच्या शेतावळ असलेल्या तलावावर पाणी पिण्यासाठी दि.१२ डिसेंबरच्या रात्रीला आला. तहान भागवून भक्षाच्या शोधात मध्यरात्री शिंदे यांच्या आखाड्यावरील २ ते २.५ वर्ष वय असलेल्या वासरावर हल्ला करून शिकार केली. हा प्रकार शेतकरी सकाळी शेतात आला असता निदर्शनास आला, त्यांनी सदरील घटनेची माहिती पोटा बु.परिसरातील वनपाल श्री पवार, वनमजूर गारोळे व पशु वैद्यकीय अधिकारी यांना दिली. तातडीने सदर अधिकार्यांनी घटनास्थळावर येउन पंचनामा केला आहे. परंतु या गंभीर घटनेकडे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री तुकाराम पांडे फिरकले नसल्याने त्यांच्या कार्य तत्परतेवर शेतकर्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

पळसपूर शिवारातील हरणाच्या मृत्यूचे गूढ कायम 
.............................. 
नुकतेच पळसपूर शिवारात मध्यरात्री भरधाव वेगात धावणाऱ्या एका हरणाचा मृत्यू झाला. या घटनेचा पंचनामा वनविभागाने केला असला तरी अद्याप सदरचे हरीण कश्यामुळे मृत झाले हे समजू शकले नाही. त्यामुळे वनविभागाच्या कार्यपद्धती संशयाच्या भोवर्यात अडकली आहे. या प्रकाराकडे उपवनसंरक्षक यांनी लक्ष देण्याची मागणी वन्यप्रेमी नागरीकातून केली जात आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी