शेतकर्याची आत्महत्या

नापिकी व कर्जाला कंटाळून शेतकर्याची विषारी औषध प्राषनाणे आत्महत्या



हिमायतनगर(प्रतिनिधी)जवळगाव येथील एका ४० वर्षीय अल्पभूधारक शेतकर्याने सततची नापिकी व कर्जबाजारीला कंटाळून विषारी औषध प्राषण करून आत्महत्या केल्याची घटना दि.१७ रोजी सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे शेतकर्याचे कुटुंब उघड्यावर आले आहे. 

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, मयत शेतकरी गणेश भुजंगा पवार यांच्या नावे जवळगाव शिवारात ५ एकर कोरडवाहू शेती आहे. गेल्या अनेक वर्षापासून ते शेतीत कापूस, सोयाबीन सारखे पिके घेतात परंतु अल्प पावसामुळे सतत तीन वर्षापासून नापिकी झाली. त्यामुळे तो व्यतिथ होता दरम्यान गत वर्षी मुलीचे लग्न कर्ज काढून केले, यावर्षीच्या शेती पिकावर कर्ज फेडायचे यासाठी काबाडकष्ट केले. परंतु सोयाबीनला म्हणावा तसा उतरारा आला नसल्याने शेतीसाठी खरीपात केलेला खर्चही निघाला नाही. त्यामुळे डोक्यावरील कर्ज फिटायचे सोडा उलट डोंगर वधूच लागला, या चिंतेत गेल्या काही दिवसापासून तो होता. दि. १६ रोजी रात्री जगलीला जातो म्हणून शेतात गेला तो घरी परतलाच नाही. सकाळी मालक घरी आले नसल्याने घरच्यांनी शोध घेतला असता शेतकरी गणेश यांचा मृतदेह दिसून आला. 

घटनेची माहिती मयत शेतकर्याचे भाऊ रामराव भुजंगा पवार यांनी दिल्यावरून हिमायतनगर पोलिस डायरीत कलम १७४ सीआरपीसी प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. मयताच्या प्रेताचे शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात दिल्यानंतर सायंकाळी ४ वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत शेतकऱ्याच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. या घटनेमुळे शेतकऱ्याच्या कुटुंबीयावर दिखाचा डोंगर कोसळला असून, यातून सावरण्यासाठी शासनाने तातडीने मदत देवून हातभार लावावा अशी मागणी परिसरातील शेतकर्यांनी केली आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी