अधिका-यांच्या बोटचेपी वृत्तीने मराठवाड्याच्या रेतीवर विदर्भातील तस्करांचा डल्ला...

हिमायतनगर(वार्ताहर)विदर्भ -मराठवाड्याच्या सिमेवरुन वाहणा-या पैनगंगा व लाखाडी नदी पात्रातुन दिवसा गणीक हजारो ब्रास रेतीचा अवैध्य रित्या उपसा केला जात आहे. महसुल विभागाच्या नाकावर टिचुन रेती तस्कर दिवसा ढवळ्या रेतीची तस्करी करीत असुन, महसुल विभागाच्या बोटचेप्या वृत्तीमुळे वाळुदादांचे फावत आहे. परिणामी शासणाचा दरदिवशी लाखो रुपयाचा महसुल बुडत आहे. या तस्करीत मराठवाड्यातील वाळु तस्करांची संख्या कमी असली तरी, विदर्भातील वाळउ तस्करांची संख्या लक्षणीय असल्याचे पर्यावरण प्रेमी नागरीकांचे म्हणने आहे.

हिमायतनगर - उमरखेड तालुक्याच्या सिमेवरुन वाहणारी पैनगंगा व लाखाडी या दोन प्रमुख नद्या वाहतात. नदी काठावर असलेल्या बोरी, चाथारी, घारापुर, दिघी, देवसरी, रेणापुर, पळसपुर, डोल्हारी, सिरपल्ली, एकंबा, कौठा, वारंगटाकळी, आदीसह जमेल त्या ठिकाणाहुुन पाच ते दहा ट्रॅक्टरव्दारे रेती रात्रं -दिवस पळवीली जात आहे. काही ठिकाणावर थेट जेसीबी मशीनच्या सहाय्याने उत्खनन करुन महासुलच्या संबंधीत अधिकारी - कर्मचा-यांना हाताशी धरुन राजरोसपणे उत्खनन केले जात आहे. हिमायतनगर तालुक्यातील हद्दीत असेलल्या एकाही रेती घाटाचा लिलाव झालेला नसतांना सर्रास रेती घाटावरुन राजरोसपणे रेतीचे उत्खन करुन पर्यावरणाला बाधा पोंचवीली जात आहे. मराठवाडयातील वाळु दादाबरोबर आता विदर्भातील रेती तस्करांनी उच्छाद मांडला असुन, मराठवाड्याच्या हद्दीत घुसखोरी करीत बेसुमार वाळु उपसा करत आहेत. रेती उपश्यासाठी पाच ते दहा ट्रक्टर व मजुरदार लाऊन नदी पात्रात मोठ मोठे खड्डे केले जात आहेत. दिवस रात्र एक ट्रॅक्टर 8 ते 10 ट्रिप वाळु नेऊन जादा दराने विक्री करण्याच्या उद्देशाने साठवणुक करीत आहेत. अवघ्या आठ दिवसावर पावसाळा येऊन ठेपल्यामुळे रेती तस्करी करणा-यांची संख्या वाढली असुन, जिकडे पहावे तिकडे नदी पात्रात वाहने व रेती काढण्यासाठी आलेले मजुर दिसत आहेत. हा सर्व प्रकार संबंधीत गावातील पोलीस पाटील, सरपंच, तलाठी, मंडळ अधिकारी व तहसिलदार यांना माहीत असतांना देखील वाळु तस्कराच्या मुसक्या अवाळण्याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करीत मॅनेजमेंटचा कारभार करुन तस्करांना अभय देत असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमी नागरीकांतुन केला जात आहे.

एकीकडे शुल्लक एखाद्या - दोन वाहनांवर कार्यवाही करायची आणि दुसरीकडे वाळु दादांना बेछुट रान मोकळे सोडायचे असा गोरखधंदा मागील तिन माहीण्यापासुन महसुलच्या अधिका-यांची मांडला आहे. याबाबात अनेक वर्तमान पत्रांतुन वृत्त प्रकाशीत झाले, मात्र वाळु तस्करांवर कारवाई करण्याच्या नावाने बोंबाबोंब चालवीली जात आहे. त्यामुळे निर्ढावलेले वाळु तस्कर आम्ही कुणाच्या बापाला भित नाही, महसुल अधिका-यांना हप्ता देत रेतचा उपसा करतो असे ठणकाऊन सांगत आहेत. यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला असुन, नदीकाठावरील नागरीक व जनावरांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. शासनाचा गलेलठ्ठ पगार घेऊन कर्तव्यात कसुर करणा-या महसुल विभागाच्या अधिकारी व कर्मचा-यावर कार्यवाहीचा बडगा उगारणे काळाची गरज असल्याच्या प्रतिक्रीया निसर्गप्रेमी नागरीकांतुन व्यक्त होत आहेत. 

येथे कार्यरत तहसिलदार झाडके यांनी सुरुवातीच्या काळात काही प्रमाणात वाळु, मुरुम, दगड यासह गौन खनीज तस्करावर कार्यवाही करुन आपली झलक दाखवीली होती. त्यानंतर पुलाच्या खालुन बरेचशे पाणी गेले त्यानंतर तेरी भी चुप मेरी भी चुपचा प्रकार चालवीण्यास सुरुवात केल्याने पुन्हा एकदा वाळु तस्करांनी चांगलाच जम बसवीत नदीत मोठ -माठे खड्डे पाडले आहेत. या सर्व प्रकाराकडे नव्याने जिल्हयाचा कारभार हाती घेतलेल्या जिल्हाधीकारी सुरेश काकाणी यांनी हिमायतनगर तालुका परीसरात होत असलेल्या गौन खनीज तस्करीच्या प्रकाराकडे जातीन लक्ष देऊन कामचुकार अधिकारी- कर्मचा-यांची चोकशी करुन तस्करांच्या मुसक्या आवळाव्यात अशी मागणी सामन्य जनतेतुन केली जात आहे. याबाबत तहसिलदार शरद झाडके यांच्याशी दुरध्वनीवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता बेल गेली परंतु त्यांनी फोन कट केल्याने या मार्गावरील सर्व लाईन व्यस्त आहेत. थोड्या वेळाने संपर्क करा असे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी