धबधबा वाहू लागला

अन अवकाळी पावसाने...
चक्क उन्हाळ्यात धबधबा वाहू लागला


 हिमायतनगर(अनिल मादसवार) विदर्भ- मराठवाड्यात सीमेवरून वाहणारा पैनगंगा नदीवरील सहस्रकुंड धबधबा दि.१४, १५ रोजी झालेल्या दामदार अवकाळी पावसाने चक्क उन्हाळ्यात सळसळ वाहू लागला आहे. हि बातमी समजताच पर्यटकांना समजताच अनेकांनी सहस्रकुंडची वाट धरली आहे. 

नांदेड - किनवट राज्यरस्त्यावरील इस्लापूर पासून ४ कि.मी.अंतरावर असलेला सहस्रकुंड धबधब्याचे मनोहारी दृश्य प्रती वर्षी पावसाळ्यात पहावयास मिळते. परंतु यंदाच्या पावसाळ्यात ऑगस्ट, सप्टेंबर मध्ये झालेल्या अल्प पावसाने धबधब्याचे दृश्य पर्यटकांना पाहण्यासाठी वाट पहावी लागली होती. उशिरा का होईना...धबधबा सुरु झाल्याचे समजताच पर्यटकांची गर्दी उसळली. परंतु मोजक्याच काही दिवसात धबधबा कोरडा पडल्याने दूरवरून येणाऱ्या अनेक पर्यटकांचा हिरमोड झाला होता. त्यानंतर तब्बल सहा महिन्यानंतर एप्रिल मध्ये झालेल्या अवकाळी पावसाच्या हजेरीने धबधब्याच्या दोन्ही धारा थोड्या प्रमाणातच का होईना सळसळ वाहू लागल्या. दि.१५ रोजी झालेल्या दमदार पावसाने इस्लापूर व हिमायतनगर भागातील नाले भरून वाहू लागले. या ओढ्याचे पाणी नदीत मिसळून वाहिल्याने हा धबधबा सुरू झाल्याचे परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दि.१८ सकाळपासून कडक उन पडल्याने नुकत्याच सुरु झालेल्या धबधब्याचे दृश्य किती पर्यटकांच्या डोळ्याचे पारणे फेडेल हे सांगणे कठीण आहे. एकूणच भर उन्हाळ्याच्या दिवसात धबधबा वाहतानाचे दृश्य दिसत असल्याने पर्यटकांचा वाटा सहस्रकुंडकडे वळल्याचे चित्र दिसत आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी