तहसीलदारांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष



हिमायतनगर(वार्ताहर)तालुक्यातील नदी, नाल्याच्या काठावर तसेच माळरानातून गौण खनिजाचे उत्खनन सर्रास सुरूच असून, याकडे स्थानिकाच्या तहसीलदाराचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमी नागरीकातून केला जात आहे.

याबाबत सविस्तर असे कि, विदर्भ - मराठवाड्याच्या सीमारेषेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीपात्रातून व नाल्यावरून मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा होत असल्यासंबंधी अनेक वर्तमान पत्रातून बातम्या प्रकाशित झाल्या होत्या. याची दाखल घेत बोटावर मोजण्या इतकी तस्करावर कार्यवाही केल्याचा दिखावा करत जानेवारी महिन्यात केवळ सहा जनन दंड आकाराला. परंतु अजूनही पैनगंगा नदीवरून चोर्या मार्गाने रेतीचा उपसा चालूच असून, प्रशासनातील महसुल विभागाचा कारभार पाहणारे तलाठी, प्रभारी मंडळ अधिकारी व तहसील कार्यालयातील जबादार अधिकारी अर्थपूर दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नदीकाठावरील गावकरी करीत आहेत.

तहसिलदाराच्या उदासीन धोरणामुळे शासनाचा लाखो रुपयाचा महसुल बुडविला जात असून, रेती तस्करांशी अधिकाऱ्यांचे साठेलोटे असल्याचेही नागरिक सांगतात. नदीकाठावरील पळसपूर, घारापुर, डोल्हारी, रेणापूर(बेचिराग) वारंगटाकळी, कामारी, एकम्बा, धानोरा, टेंभी(मासोबा नाला) आदीसह अन्य ठिकाणावरून रेतीचा सर्रास उपसा केला जात आहे. यामुळे शासनाचा लाखोचा महसूल बुडत आहे. वरिष्ठ स्तरावरून निष्क्रिय तहसीलदार व साते लोटे करणारे मंडळ अधिकारी, तलाठी यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी पर्यावरण प्रेमी नागरीकातून केली जात आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी