नांदेड न्युज लाईव्हच्या वाहनाला प्रतिसाद

हिमायतनगर(वार्ताहर)सर्वात प्रथम नांदेड न्युज लाईव्हने कुपोषणामुळे १८ वर्षीय अनुसया केवळ १७ किलो वजनाची भरली. या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून सामाजिक संस्था व प्रशासनाने कुपोषणाच्या दाढेतून बाहेर काढण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत नांदेड जिल्हा विश्वप्रेम प्रतिष्ठानच्या सदस्या सौ.मंगलाबाई पाटणी यांच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या निधीतून वागतकर कुटुंबास दि.०९ रोजी खाद्य साहित्य, पौष्टिक आहार ची मदत दिली आहे. 

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नांदेड न्युज लाईव्हचे विशेष प्रतिनिधी यांनी प्रत्यक्ष वाळकेवाडी येथे भेट दिली असताना १८ वर्षीय अनुसया केवळ १७ किलो वजनाची असल्याचे समजले. त्यांनी केलेले वृत्तांकन दि.०६ रोजी प्रसिद्ध करताच नांदेडच्या विश्वप्रेम प्रतिष्ठान यांनी नांदेड न्युज लाईव्हला संपर्क करून मदतीचा हात देणार असल्याचे सांगितले होते. तसेच त्यांच्या माध्यमातून सदर कोपोषित युवतीस मृत्युच्या दाढेतून वाचविण्यासाठी ज्यांना कोणाला मदत द्यायची त्यांनी संपर्क करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत विश्वप्रेम प्रतिष्ठानच्या सदस्या सौ.मंगलाबाई पाटणी यांनी आपल्या वाढदिवसावर केला जाणारा खर्च टाळून वाळकेवाडी येथील मुलीस व तिच्या कुटुंबियांची दि.०९ सोमवारी भेट घेवून कुपोषित मुलीचे सर्व माहिती जाणून घेतली. तसेच यावेळी श्री हुकूमचंद जैन, विशाल जैन, हिमायतनगर येथील गोविंद गोडसेलवार यांनी तिच्या वडिलास दारू, दिगारेत, बिडी आदी व्यसन बंद करण्याची शपथ दिली. त्यानंतर श्री जैन, गोविंद बंडेवार, अनिल मादसवार, सौ.सुनंदा गोडसेलवार, सौ.स्वप्ना मादसवार राजू गोडसेलवार, शेख खयुम, गाजू गुड्देतवार, धम्मपाल मुनेश्वर, यांच्या हस्ते सदर कुटुंबास दोन महिने पुरेल असे गहू, ज्वारी, तांदूळ, सर्व प्रकारची डाळ, साखर, तेल, तूप, पोषण आहार, मल्टी व्हिटैमीन युक्त टोनिक, आदि साहित्य भेट दिली. अश्या प्रकारच्या व कुपोस्नानाने ग्रस्त झेलेल्या अनेक लहान बालके, व अन्य आजाराने त्रस्त नागरिकांना सर्व तोपरी मदत करण्याचे आश्वासन श्री जैन यांनी यावेळी दिले. तसेच हिमायतनगर येथील प्रतिष्ठित व्यापारी श्री भास्कर चिंतावार यांनी सुद्धा जैन यांच्या भेटीत या सामाजिक कार्यास मदत करण्यास तत्पर असल्याचे सांगितले. 

अनेकांनी मांडल्या व्यथा 
---------------- 
यावेळी बोलताना नांदेड येथील विश्वप्रेम धर्मार्थ आयुर्वेदालय काबरा नगरच्या मुख्य प्रवक्त्या वर्षा जमदाडे यांच्या मार्फत अश्या रुग्णांना निशुल्क औषध उपलब्ध करून देण्याचे कार्य चालू आहे. या नंतर सुद्धा कोणत्याही पिडीताना मदत करण्यासाठी और्वेदिक औषधी उपलब्ध करून देण्यात येतील असा विश्वास श्री जैन यांनी बोलून दाखविला. यावेळी गावातील उपस्थितांपैकी अनेकांनी आपल्या पाल्यांच्या अंगी असलेल्या आजाराची माहिती दिली. तसेच या ठिकाणी लहान बालकातही कुपोशानाचे प्रमाण वाढत असल्याने ८ अति गंभीर व १८ साधारण अशी सांख्य असल्याचे सांगितले. तसेच फुलवंता माधव वाकोडे, धुरपता गोमाजी डवरे हि कुपोषित बालके घेवून त्यांचे पालक उपस्थित झाले. तर २५ व्या वर्षाची शोभा दिगंबर वाकोडे हिने सुद्धा आपली व्यथा मंडळी. शे.रहेमान शे.लालजी या अपंगाने सुद्धा त्रस्त असल्याचे सांगितले तर उपस्थित काही पालकांनी अंगणवाडीतून सुरळीत आहार दिला जात नसल्याची खंत व्यक्त केली. यावेळी बापूराव डवरे, श्यामराव मेटकर, गजानन मेटकर, श्यामराव डवरे, बालाजी भुरके, संतोष देशमुखे, बाळू धुमाळे, यांच्यासह अनेक नागरिक व महिला उपस्थित होत्या. 

वैद्यकीय अधिकाऱ्यांची घेतली भेट 
----------------------------------- 
प्रतिष्ठानचे सदस्य श्री हुकूमचंद जैन यांनी सर्सम प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी श्री हुरसुले यांची भेट घेवून येथील पिडीत नागरिकांच्या व्यथे बरोबर १८ वर्षीय कुपोषित अनुसायची संपूर्ण चाचणी करून सहकार्य करण्याची विनंती केली. यावर त्यांनी आमच्यातर्फे सर्व रुग्णांची तपासणी करून कुपोषणमुक्त गाव करण्यासाठी सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी