खा.सातव यांनी घेतेली भेट

हिमायतनगर(गोविंद गोडसेलवार)१८ व्या वर्षीत कुपोषणाने १७ किलो वजनाची झालेल्या अनुसया हिचे वास्तव चित्र नांदेड न्युज लाइव्हने दि.०६ रोजी प्रकाशित होताच प्रशासन तर हादरलेच, परंतु विश्वाप्रेम प्रतिष्ठान सदर मुलीच्या मदतीला हातभार लावण्यासाठी तयार झाली आहे. त्यानंतर दत्तक गाव घेतलेल्या खा.राजीव सातव यांनी सुद्धा दि.०८ रविवारी वाळकेवाडी गावाला भेट देवून कुपोषित मुलीच्या कुटुंबाची आस्थेवाईकपने विचारपूस केली. तसेच प्रशासनाला तात्काळ तपासणी करून उपचार सुरु करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

या बाबत सविस्तर वृत्त असे कि, आदिवासी बहुल भागात व तेलंगाना - महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या वाळकेवाडी गावातील एका गरीब कुटुंबातील अनुसाया हिचे १८ वर्ष वय असताना वजन मात्र १७ किलो असल्याचे उजेडात आले आहे. कुपोषणाने ती मृत्युच्या दाढेत ओढली जाईल अशी भीती तिच्या कुटुंबियांना वाटत आहे. हि बाब समजताच नांदेड न्युज लाइव्हचे विशेष प्रतिनिधीने सदर कुतुमाबाची भेट घेऊन प्रथम माहिती जाणून घेतली. त्यानंतर हि दुर्लक्षित बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या वृत्ताची दाखल घेत हिंगोली लोकसभेचे खा.राजीव सातव यांनी वाळकेवाडी येथे तातडीने दि.०८ रोजी भेट देवून कुपोषणाने ग्रासलेल्या वागतकर कुटुंबियांची भेट घेऊन आस्थेवाईकपने विचारपूस केली. तसेच तिच्या या प्रकृतीला कारणीभूत असलेल्या सर्व बाबी जाणून घेण्यासाठी आरोग्य विभाग, बालविकास प्रकल्पाच्या अंगणवाडी ताई व अधिकार्यांना सूचना करून तातडीने गावातील सर्व प्रकारचा सर्वे करून अहवाल सादर करण्याचे सांगितले. तसेच जिल्हा आरोग्य अधिकार्यांना दूरध्वनीवरून या बाबतीत गांभीर्याने अनुसयाची तपासणी करून तिला कश्या प्रकारची मदत करता येईल आणि वजन वाढवून कुपोषण मुक्त करण्यासाठी सर्व तोपरी प्रयत्न करण्याचे सुचित केले. तसेच गावच्या सर्व नंतर अश्या प्रकारचे किती रुग्ण व कुपोषित बालके आहेत. त्यांच्यासाठी विशेष प्रयत्न करून सहा महिन्यात गाव कुपोषण मुक्त करा असे आदेश उपस्थित अधिकार्यांना दिले. तसेच आदर्श संसद गाव बनविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी उपस्थित नागरिक व पत्रकारांना दिले. यावेळी त्यांनी दुधड येथील अकाली अपंगत्व आलेल्या वयोवृद्ध कामाजी हातमोडे यांची भेट घेवून विक्रापूस केली. यावेळी माजी आ.माधवराव पाटील, माजी सभापती यशवंत प्रधान, जी.प.सदस्य सुभाष राठोड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दत्तराम पाटील, विकास पाटील, गणेश शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, म.जावेद आ.गन्नि, सरसम प्राथमिक अरोय केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. हुरसुले, विस्तार अधिकारी श्री चिंतावार, ग्रामसेवक आरु, नांदेड न्युज लाइव्हचे संपादक अनिल मादसवार, पत्रकार अशोक अनगुलवार, अनिल भोरे आदींसह अनेकांची उपस्थिती होती.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी