दगडाने ठेचून क्रूरहत्या

टेंभी रस्त्यालगत शीवारात अज्ञात युवकाची दगडाने ठेचून क्रूरहत्या  

हिमायतनगर(वार्ताहर)तालुक्यातील मौजे टेंभी रस्ता शिवारात एका अज्ञात युवकाची दगडाने ठेचून क्रूरपणे हत्या केल्याची घटना दि.२३ रोजी सकाळी १० वाजता उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, युवकाची हत्या कोणत्या कारणाने झाली हे अद्याप गुलदस्त्यात आहे. दरम्यान भोकरचे उपविभागीय पोलिस अधिकारी योगेश कुमार यांनी घटनास्थळी भेट देवून श्वान पथकाला पाचारण करून तपासाला गती दिली आहे.

या बाबत सविस्तर वृत्त असे कि, किनवट - भोकर रस्त्यावरील असलेल्या हिमायतनगर शहरात  शहरापासून ४ कि.मी.अंतरावर असलेल्या टेंभी रस्त्यालागतच्या शिवारातील शेतात दि.२३ सोमवारी एका अज्ञात युवकाचे मृतअवस्थेत प्रेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनि घटनास्थळ गाठून पाहणी केली असता सदरचे प्रेत हे पालथ्या अवस्थेत होते. प्रेताच्या बाजूलाच एका कंपनीचे १० रुपयाचे सीम व्हावचर, आगपेटी, देशी दारूच्या बॉटल, अंगावर लाल रंगाची ती शर्त, धुरकट रंगाची पैंट, उंची १७० से.मी., रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या युवकाचा मृतदेह आणि त्याचे पडलेले दात आदी वर्णन पोलिसांनी केले आहे. अज्ञात मारेकर्यांनी मृतक युवकाची ओळख पटू नये म्हणून त्याचा चेहर अत्यंत क्रूरपणे कोणत्या तरी साहित्याने ठेचून करण्यात आला असल्याचे स्पष्टपणे दिसत होते. प्रेताच्या तोंडात, नाकात माती गेल्याने चेहरा छिन्न विच्छिन्न झाला असून, त्याची ओळख पटविणे पोलिसांना आव्हान बनले आहे. मयत युवक हा अंदाजित ३५ वर्ष वय असून, कोण्यातरी वैक्तिक कारणाने याचा खून झाला असावा असा कयास पोलिसांनी बांधून पंचामना सुरु केला. 

दरम्यान अज्ञात व्यक्तीच्या हत्या झाल्याची व प्रेत आढळून आल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री चव्हाण यांनी वरिष्ठांना कळविले. त्यावरून दुपारी भोकरचे उपविभागीय पोलिस अधिकारी योगेश कुमार यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच श्वान पथकाला पाचारण करून जप्त केलेल्या साहित्याच्या दुर्गंधीच्या दिशेने तपास सुरु करण्यात आला. कैंडी नामक श्वानाने संपूर्ण परिसर फिरून राज्य रस्ता गाठून अज्ञात मारेकरी हे कोण्यातरी वाहनाने फरार झाल्याचे संकेत दिले. 


पोलिस उपनिरीक्षक सुशील चव्हाण यांच्यामार्फत घटनेचा पंचनामा करण्यात येवून प्रेत उत्तरीय तपासणीसाठी सरसम प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवीण्यात आले आहे. सध्या तरी या हत्येच्या घटनेचे कोडे उलगडले नसून या खुनाचा तपासाला गती देवून लवकरात लवकर छडा लाऊ असे आश्वासन डी. वाय. एस. पी. योगेश कुमार यांनी पत्रकारांशी बोलताना दिले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी